pune municipal corporation  Sakal
पुणे

Pune News : विरोधकांच्या एकीने महापालिकेत भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता

कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या २८ वर्षापासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाल्याने हा मतदारसंघ सुरक्षीत मानला जात होता.

​ ब्रिजमोहन पाटील

कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या २८ वर्षापासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाल्याने हा मतदारसंघ सुरक्षीत मानला जात होता.

पुणे - काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीने कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक एकत्र निवडणूक लढवून भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो हे दाखवून दिले. ही आघाडी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत कायम राहिली तर भाजपच्या ९९ नगरसेवकांपैकी ५७ जण धोक्यात येऊ शकतात असे आकडेवारी वरून समोर आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आघाडी राहणार की नाही यावर महापालिकेतील सत्ताधारी ठरणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या २८ वर्षापासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाल्याने हा मतदारसंघ सुरक्षीत मानला जात होता. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यात २०१९ मध्ये स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपचे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कसब्याकडे सर्वांच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतांची फाटाफूट न होता भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यामध्ये १६२ पैकी ९९ नगरसेवक भाजपचे निवडून गेले. या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. गेल्या एका वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका कधी होणार हे स्पष्ट झालेले नसले तरी कसब्याच्या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपचे डोळे उघडणारा ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता हवी असेल तर किमान ८७ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजपकडून यापूर्वी११० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

असा बसू शकतो फटका

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी कायम ठेवली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. चारचा प्रभाग झाला तर त्यांचे ९९ पैकी ५७ नगरसेवक धोक्यात येऊ शकतात. तर ४२ नगरसेवकांना या आघाडीचा कोणताही फरक पडणार नाही., तेथे भाजपची ताकद जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, आघाडीतील कुरबुरी, जागा वाटपातील वाद, त्यातून होणारी बंडखोरी, स्थानिक समीकरणे, नातीगोती, उमेदवाराची प्रतिमा हे मुद्देही लक्षात घेऊन काही प्रभागात भाजपला दिलासाही मिळू शकतो. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून कोणत्या कोणत्या प्रभागात फटका बसू शकते हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी झाली तर धोक्यात आलेले भाजपचे प्रभाग क्रमांक (अडचणीत असलेल्या नगसेवकांची संख्या)

प्रभाग क्रमांक १ धानोरी कळस (३), प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमनाथनगर (४), प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर (३), प्रभाग क्रमांक पुणे विद्यापीठ वाकडेवाडी ७ (४), प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी (४), प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी (२), प्रभाग क्रमांक १० बावधन खु. कोथरूड डेपो (२), प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर ( १), प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना (४), प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ (१), प्रभाग क्रमांक १७ रस्ता पेठ रविवार पेठ (१), प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ (३), प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर कासेवाडी (१), प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क घोरपडी (१), प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी (२), प्रभाग क्रमांक २५ वानवडी (२), प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी कौसरबाग (१), प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ पर्वती (२), प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत दत्तवाडी (३), प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर (३), प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी (१),प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर पद्मावती (१), प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड लोअर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुपर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर राजीव गांधी नगर (२), प्रभाग क्रमांक ३९ आंबेगाव दत्तनगर कात्रज गावठाण (१), प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी (३).

या भागात दिलासा

नागपूरचाळ फुलेनगर, बावधन कोथरूड डेपो, डहाणूकर कॉलनी, एरंडवणा,शनिवार पेठ, सदाशिव पेठ, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, इंदिरानगर या भागातील भाजपला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तेथे महाविकास आघाडीचा प्रभाव कमी असल्याचे २०१७ च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT