Corona_Disaster_Pune 
पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; गोरगरीब आणि गरजू पुणेकरांना मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब योजनेस पात्र असलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना  कोणतीही मर्यादा न राखता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत या योजनेचा अमर्यादित लाभ देण्यात यावा, असा ठराव पुणे महानगर महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीत गुरुवारी (ता.१३) मंजूर करण्यात आला.

पुणे शहरामध्ये राहणाऱ्या गोरगरीब, गरजू तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता पुणे महानगर महापालिकेमार्फत शहरी गरीब योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांना एका आर्थिक वर्षामध्ये रुपये १ लाखपर्यंत आरोग्यसेवा पुरविण्यात येते.

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची महामारी पसरली असून आपल्या राज्यात आणि पुणे शहरात अनेक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये गोरगरीब नागरिकांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. 

अशा परिस्थितीत पुणे शहरामध्ये राहणाऱ्या गोरगरीब, गरजू नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा, तसेच नागरिकांची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूने आजारी असलेल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेस पात्र असलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मर्यादा न राखता सदर योजनेचा अमर्यादित लाभ देण्यात यावा, असा ठराव समितीच्या अध्यक्षा नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी मांडला होता. हा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT