Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Exam : पुणे महापालिकेच्या परीक्षेसाठी ८० टक्के उपस्थिती

पुणे महापालिकेतील नऊ पदांसाठी ३२० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, आज पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतील नऊ पदांसाठी ३२० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, आज पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

यावेळी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ७२.४५ टक्के उमेदवारी सकाळच्या सत्रात तर ८० टक्के उमेदवारांनी दुपारच्या सत्रात परीक्षा दिली. ही ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पाडली अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे भरले जात आहेत. आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील ३२० पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील काही पदांची परीक्षा गुरुवारी झाली. उर्वरित पदांची परीक्षा २ जुलै होणार आहे.

परीक्षा केंद्रात प्रवेश दिल्याची तक्रार

पुण्यातील रामटेकडी येथील केंद्रावर परीक्षा केंद्रामध्ये जाऊ दिले नाही, गेट बंद करून घेण्यात आले अशी तक्रार काही उमेदवारांनी केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने खुलासा केला आहे.

सकाळच्या सत्रातील परिक्षा साडे आठ वाजता होती, त्यासाठी उमेदवारांनी सकाळी साडेसात वाजता केंद्रावर पोहचावे असे प्रवेशपत्रावर स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सव्वाआठ वाजता परीक्षा केंद्राचे दरवाजे बंद झाले. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: पहलगाम हल्ल्याचा धाक दाखवत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ८२ वर्षीय आजींना ७३.३० लाखांचा गंडा

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT