Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे महापालिकेला मिळेना ‘ई कार’ भाडे तत्त्वावर

पर्यावरण रक्षणासाठी पेट्रोल डिझेलवरच्या कार नको,

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पर्यावरण रक्षणासाठी पेट्रोल डिझेलवरच्या कार नको, त्यासाठी ई कार आवश्‍यक असल्याने मोठा गाजावाजा करत महापालिकेने प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी चालकांसह ‘ई कार’ भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुदत संपत आली तरी चार महिन्यात महापालिकेला अद्याप एकही कार मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संबंधित पुरवठादाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या ताफ्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह कचरा संकलन, पाणी पुरवठा, अतिक्रमण यासह इतर विभागांसाठी महापालिकेला वाहने घ्यावी लागतात. महापालिकेच्या ताफ्यात सुमारे १ हजार ३०० वाहनांचा समावेश आहे.

इलेक्ट्रीक मोटारींमुळे पारंपारिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यासही केंद्र सरकारने मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीने ई मोटारी भाडेतत्वावर पुरविण्यासाठी महापालिकेकडे विचारणा केली होती. त्यानुसार ३८ टाटा नेक्सॉन ई कार चालकासह ८ वर्षे भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ८ वर्षांनंतर या कार किंमतीच्या ५ टक्के रक्कम भरून पालिकेला स्वतःच्या मालकीच्या करून घेता येतील.

यासाठी कार व चालकासह २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार आहे. या गाड्या घेतल्यास महापालिकेचे महिन्याला १ लाख ७७ हजार रुपयांची बचत होणार आहे, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले होते. मात्र, या प्रस्तावाला महापालिकेतील चालकांनी व विरोधी पक्षांनी विरोध केल्याने तीन महिने निर्णय झाला नाही. अखेर ३१आॅक्टोबर रोजी स्थायी समितीने हा विषय बहुमताने मान्य करताना केवळ ३८ कार भाड्याने घेतल्या जातील, चालक हे महापालिकेचे असतील अशी उपसूचना देण्यात आली होती.

स्थायी समितीचा निर्णय झाल्यानंतर मोटर वाहन विभागाने संबंधित पुरवठादार कंपनीशी करार केला व कार पुरविण्याची मागणी केली. पण तीन महिने उलटून गेले तरी महापालिकेला अद्याप एकही ई कार उपलब्ध करून दिलेली नाही.

कार उपलब्ध नसल्याचे कारण

स्थायी समितीने चालकाशिवाय ३८ ई कार भाड्याने घेण्याचे निश्‍चीत केले आहे. करार केल्यानंतर १५ फेब्रुवारी पर्यंत कार पुरविणे आवश्‍यक होते. प्रशासनाने यासाठी पुरवठादार कंपनीकडे चौकशी केली असता आत्ता बाजारात कार उपलब्ध होत नसल्याचे कारण दिले सांगितले आहे. पण वारंवार हेच कारण सांगितले जात असल्याने अखेर त्यास नोटीस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेने ३८ ई कार एनर्जी ईफिसिएन्सी लि. ही कंपनीकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासोबत करारही झाला आहे. पण अजूनपर्यंत एकही कार महापालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीला नोटीस बजावली जाणार आहे. तसेच महापालिकेने दुसऱ्या कंपन्यांकडून ई कार भाड्याने घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.’’

डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

महापालिकेतील वाहनांची सद्यःस्थिती

  • घनकचरा - ६५२

  • जीप - २११

  • अग्निशामक दल - ९०

  • कार व इतर वाहने - २८०

  • जेसीबी - ३५

  • रुग्णवाहिका - ३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT