Pune Municipal Corporation took an important decision regarding water cut 
पुणे

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

ज्ञानेश सावंत

पुणे : पुण्यात पावसाने ओढ दिली असल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. तरीही गणेशोत्सव संपेपर्यंत पाणीकपात राहणार नाही. कोरोनाची साथ आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन तुर्तास पाणीकपात नसले, असे महापौर मुरलीवर मोहोळ यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढच्या पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरीही, पुण्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जेमतेम आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे.

आयुक्तानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली!

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा, पाण्याचा वापर आणि गरज, या बाबींचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापौर मुरलीवर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांच्यासह महापालिका आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरासाठी महिन्याकाठी सव्वा टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार वर्षाकाला साडेतेरा टीएमसी पाणी उचलले जाते. मात्र; सध्या पाणीसाठा पाहता पुणेकरांसह शेतीचा विचार केल्यास पुढच्या काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच पाऊस नसल्याने महापालिका आणि पाटबंधारे खात्यापुढच्या अडचणी वाढल्या आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत त्यानुसार पाऊस न झाल्यास पाणीकपाती शिवाय पर्याय उरणार नाही, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे.

पुण्यात नायडू हॉस्पिटलमधील 20-25 कोरोना पेशंटचा जीव लागला होता टांगणीला

सध्या कोरोनाची साथ असल्याने वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा आणि गरज आहे, लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT