pune municipal corporation  Sakal Media
पुणे

पुणे महापालिका करणार २० टन ऑक्सिजनची निर्मिती

आठ रूग्णालयांत बारा प्रकल्प.

ब्रीजमोहन पाटील

पुणे ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॅक्सिजन कमतरतेचा चटका महापालिकेला लागल्यानंतर त्यातून आता स्वतःच्या रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पालिकेचे दोन प्रकल्प सुरू झाले असून एकूण १२ प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे आॅक्सीजन निर्मितीची क्षमता प्रति मिनिट १०.५८३ लिटर म्हणजे दिवसाला २० टन इतकी होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या अजूनही कायम आहे. त्यामुळे आॅक्सिजनची मागणी कमी झालेली नाही. तसेच पालिकेला तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे.

आॅक्सिजन कमी पडून आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या मध्यम आणि मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविण्याचे काम सुरू झाले आहे. ८ रुग्णालयात १२ प्रकल्प सुरू केले जातील. यासाठीचे आवश्‍यक सामग्री अमेरिका, फ्रांस आणि नेदरलँड येथून मागविण्यात आली आहे.

या सर्व प्रकल्पांतून १०५८३ लिटर प्रति मिनीट ऑक्सिजन निर्माण होणार आहे. महापालिकेकडे सध्या ४० टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करणेसाठी एकूण ७ टँक बसविण्यात आले आहेत', आॅक्सिजन निर्मितीमध्ये पालिकेची ही वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT