पुणे

लस खरेदीसाठी पुणे घेणार मुंबई महापालिकेची मदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील लसीकरण (Vaccination) गतीने करण्यासाठी पुणे महापालिकेने (PMC Pune) ‘ग्लोबल’ टेंडर (Global Tender) करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. हे टेंडर काढताना त्याचा मसुदा कसा असावा, यासाठी मुंबई महापालिकेकडे(BMC) मदत मागण्यात आली आहे. हा मसुदा निश्‍चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकारकडून येणारी लस ही पुण्याला अपुरी ठरत असून शहरातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत आहे. नागरिकांना आॅनलाइन बुकिंग मिळेना आणि थेट केंद्रावर गेल्यास वशिल्याशिवाय काय होत नाही, अशी स्थिती आहे. पुढील काळात पुण्यासाठी किती लस राज्य व केंद्रातून मिळणार हे देखील स्पष्ट नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने थेट ‘ग्लोबल’ टेंडर काढून लस खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Pune Municipal Corporation will take help for purchase of vaccine)

ज्येष्ठ नागरिक आणि १८ ते ५९ या वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असणाऱ्यांची संख्या सुमारे ३१ लाख ५० हजार इतकी आहे. प्रत्येक नागरिकास दोन डोस याप्रमाणे महापालिकेला किमान ६३ लाख डोसची आवश्‍यकता आहे. आत्तापर्यंत ९ लाख डोस देण्यात आलेले आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी पुण्यात जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्‍यक असल्याने त्यादृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली आहे.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘‘लस मिळविण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुंबई महापालिकेने यासाठी तयारी केली असून, त्यांनी ग्लोबल टेंडर कशा पद्धतीने काढला आहे, याचा मसुदा कसा आहे, हे पाहिले जाईल. हा मसुदा देण्याची तयारीही मुंबईने दर्शविली आहेत. त्यानुसार आपली प्रक्रिया सुरू होईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची बीडमधील ८ जून रोजीची सभा रद्द; काय आहे कारण?

Mumbai Police: मुंबईत स्पेशल 26! पोलीस असल्याचा बनाव करत कॅफे मालकाच्या घरात घुसले अन् 25 लाख लुटले

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, टीम म्हणाली, "आमची क्वीन सध्या देशाप्रती..."

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

SCROLL FOR NEXT