vaccination
vaccination esakal
पुणे

पुणे महापालिकेच्या १३९ केंद्रांवर आज लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

महापालिकेला जवळपास एका आठवड्यानंतर कोव्हीशील्ड लस उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ च्या पुढील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जाईल.

पुणे : शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्डचे २४ हजार डोस आणि कोव्हॅक्सीनचे साडे तीन हजार डोस प्राप्त झाले आहेत. गुरुवारी (ता.३) १२४ केंद्रांवर कोव्हीशील्ड, तर १५ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण केले जाईल. प्रत्येक केंद्रावर १०० डोस वितरित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Pune Municipal Corporation will vaccinate 139 centers on Thursday)

महापालिकेला जवळपास एका आठवड्यानंतर कोव्हीशील्ड लस उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ च्या पुढील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जाईल. पहिल्या डोससाठी ऑनालइन नोंदणी करणाऱ्यांना कोव्हीशील्ड लस उपलब्ध आहे. सायंकाळी लसीकरण संपताना वायलमधील काही डोस शिल्लक असल्यास ऑनस्पॉट नागरिकांचे लसीकरण करावे, लस वाया घालू नये, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

असे आहे नियोजन

कोव्हिशील्ड

- ४५ वयाच्या पुढील आणि ८४ दिवसांपूर्वी (११ मार्च) पहिला डोस घेतला अशांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाईल.

- ६० टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या ४५ च्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी.

- ऑनलाइन बुकिंग गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

- उरलेली लस दिव्यांग, स्तनदा माता, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ४५ च्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोस.

कोव्हॅक्सिन

- १००टक्के लस फक्त दुसऱ्या डोससाठी वापरली जाईल.

- १८ वयाच्या पुढील ज्या नागरिकांना पहिला डोस २८ दिवसांपूर्वी (६ मे) झालेत त्यांना दुसरा डोस दिला जाईल.

- ६० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून आलेल्यांसाठी

- ऑनलाइन बुकिंग गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

- ४० टक्के लस थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT