म्युकरमायकोसिस ई सकाळ
पुणे

पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. पण अनेकांना त्याची लक्षण त्वरित लक्षात येत नसल्याने उपचारास उशीर होत आहे. असे रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.(Pune Municipal Corporation, ZP's search operation for Mucormycosis patients)

एक एप्रिलनंतर कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना महापालिका प्रशासन फोन करून चौकशी करणार आहे. ही शोधमोहिम २८ मेपासून सुरू होणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फोन केले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर जिल्हा परिषदेतर्फे तीन दिवसांत सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. हे सर्वेक्षण येत्या २७ मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

सर्वेक्षणासाठी प्रश्‍नावली तयार केली असून, स्मार्ट सिटीच्या कॉल सेंटरमधून या रुग्णांना फोन केले जातील. लक्षणे आहेत का, हे शोधण्यासाठी प्रश्‍न विचारले जाणार आहेत. जर लक्षणे आढळून आली तर त्यांना तपासणीसाठी कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. जर लक्षणे असतील या रुग्णांवर दळवी रुग्णालयात उपचार सुरू केले जाणार आहेत.


दरम्यान, अनियंत्रित मधुमेह, स्टरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्युनोमॉड्युलेटर औषधांचा उपचारात वापर करणे. दीर्घ काळ अतिदक्षता विभागात उपचार चालू असणे, दीर्घकाळ ऑक्सिजनवरील उपचार, सहव्याधी, किडनी व यकृताचे जुने आजार, उपचारासाठी दीर्घकाळ उच्चप्रितजैविकांचा वापर, रुग्णाला दीर्घकाळ नळीद्वारे अन्नाचा पुरवठा करणे आदी प्रमुख कारणांमुळे म्युकरमायकोसिस हा आजार होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या सर्वेक्षणाबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे.


''लवकर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.''
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


हे प्रश्‍न विचारेल जाणार

  • किती दिवस व किती प्रमाणात स्टेरॉईड देण्यात आले ?

  • मधुमेहचा त्रास आहे का ?

  • किती दिवस व्हेंटिलेटर/आयसीयूमध्ये होतात?

  • दात, डोळे, डोके दुखण्याचा त्रास आहे का?

  • डोळ्यावर सूज आहे का?

  • दिसण्यात फरक हे का?

  • चेहऱ्यावर एका बाजूला सूज व रंग बदलला आहे ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT