Pune sakal
पुणे

Pune : पालिकेच्या टँकरच्या पाण्याची मांजरी बुद्रुकमध्ये होतेयं विक्री, संतप्त कार्यकर्त्यांची टँकरवर दगडफेक

मांजरी बुद्रुक गावाचा दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. यापूर्वीची ग्रामपंचायतची सेवा मोडकळीस आल्याने गावात पाणी टंचाई जाणवत होती.

कृष्णकांत कोबल

Pune - उपोषणे, आंदोलने व पाठपुराव्याने गावात पालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, गेली अनेक महिन्यांपासून ठेकेदाराकडून हे पाणी मोफत देण्याऐवजी विकले जात आहे. टँकरचालकाला अनेकदा समज देऊन व अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेले कार्यकर्ते व काही ग्रामस्थांनी थेट टँकरर दगडफेक करून प्रशासनाविरोधात राग व्यक्त केला.

मांजरी बुद्रुक गावाचा दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. यापूर्वीची ग्रामपंचायतची सेवा मोडकळीस आल्याने गावात पाणी टंचाई जाणवत होती. गावठाण हद्दीतील काही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून या प्रश्नाला वाचा फोडली. त्यामुळे काही दिवसांपासून या भागात पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, पाणीपुरवठा ठेकेदार अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे पाणी मोफत न देता थेट विक्री करीत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले होते. कार्यकर्त्यांनी ठेकेदार व टँकरचालकाला त्याबाबत समजही दिली होती. मात्र, पाणी विक्री सुरूच असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती. तरीही पाणी विक्रीवर कारवाई न होता संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे संतापलेले काही ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी टँकरवर दगडफेक केली.

येथील माळवाडी, मांजराईनगर, गावठाण, सटवाईनगर, कुंजीर वस्ती आदी भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु त्यामध्ये सामान्य नागरिक महिलांकडून पाण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे.

एक बॅलर पाण्यासाठी वीस रुपये तर खासगी ठिकाणी, हॉटेल, भाडेकरूच्या इमारती आदी ठिकाणी संपूर्ण टॅन्कर खाली करण्यासाठी पाचशे रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे, अशी तक्रार सुनील राखपसरे, विद्याधर भोसले, नवल कुंजीर, अनुराधा भोकरे, सविता मोगल, रेखा महिंद्रेकर, राधिका भिंताडे यांनी केली आहे.

"आगोदरच येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिकेकडून मिळाणारे टँकरचे पाणीही अपुरे आहे. दोन वर्षे होऊनही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. मिळतात त्या टँकरच्या पाण्याची पुन्हा खासगी ठिकाणी विक्री केली जात आहे.

तसेच सामान्य नागरिकांचीही पाण्यासाठी कोंडी केली जात आहे. त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहिली तर अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.'

बाळासाहेब घुले, स्थानिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT