murder
murder sakal
पुणे

वडीलांना शिवीगाळ केल्याच्या रागातुन मुलाने केला एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वडीलांना शिवीगाळ करीत असल्याच्या रागातुन मुलाने एकावर लोखंडी धारदार वस्तुने वार करुन खुन केला. हि घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कात्रज जवळील गुजर निंबाळकरवाडी येथे घडली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने आरोपीस जेजुरी येथून अटक केली. (Pune Crime News)

दशरथसिंग राजपुत (वय 45, रा. सणसनगर स्मशानभुमीजवळ, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर समीर बापू निंबाळकर (वय 31, रा. महालक्ष्मी मंदिराजवळ, निंबाळकरवाडी, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी व दशरथसिंग रजपुत या दोघांचीही घरे एकमेकांच्या जवळ होती, त्यामुळे त्यांची ओळख होती.

राजपुत हा शेळीपालनाचा व्यवसाय करीत होता. तो दारु पिऊन आरोपीच्या वडीलांना सातत्याने शिवीगाळ करीत होता. त्या रागातुन समीर निंबाळकर याने शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता राजपुत हा सणसनगर येथील सुमती बालवण शाळेच्या पाठीमागील बाजुकडील रस्त्यावर थांबला होता.त्यावेळी निंबाळकरने तेथे जाऊन राजपुत यास शिवीगाळ करीत जाब विचारला. त्यानंतर राजपुतला जोरात ढकलून दिल्याने तो खाली पडला. त्यावेळी त्याने तेथे पडलेल्या लोखंडी धारदार वस्तुने राजपुतवर वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने राजपुतचा मृत्यु झाला.

गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले व त्यांच्या पथकाकडून आरोपीचा समांतर तपास सुरू होता.दरम्यान, राजपुतचा खुन केल्यानंतर समीर निंबाळकर हा पोलिसांपासून लपण्यासाठी जेजुरीजवळील भोसले वाडी येथे राहणाऱ्या त्याच्या मामाच्या घरी गेल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी भोसले वाडीतील सोमनाथ भोसले यांच्या घराच्या मागे लपलेल्या समीर निंबाळकर यास सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्यास पुढील कार्यवाहीसाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. हि कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, निखील जाधव, समीर पटेल, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT