pune  sakal
पुणे

Pune:आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत करत खडकवासला येथील बिलाल मस्जिद ट्रस्टचा सामाजिक सलोख्याचा संदेश

मस्जिद मध्ये नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव सामाजिक कार्यासाठी स्वखुशीने काही रक्कम दान करतात ज्याला 'जकात' म्हटले जाते.

निलेश बोरुडे

सिंहगड - खडकवासला येथील बिलाल मस्जिद ट्रस्टने गोऱ्हे बुद्रुक व एनडीए दहा नंबर गेट जवळील आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे. गोऱ्हे बुद्रुक व एनडीए गेट येथील एकूण वीस कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढ्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.

मस्जिद मध्ये नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव सामाजिक कार्यासाठी स्वखुशीने काही रक्कम दान करतात ज्याला 'जकात' म्हटले जाते.

खडकवासला येथील बिलाल मस्जिद ट्रस्ट या जकातीतून जमा झालेल्या रकमेचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, एखाद्या गरजू रुग्णाच्या खर्चासाठी किंवा इतर समाजोपयोगी उपक्रमासाठी करते. कोरोना आपत्कालीन परिस्थितीतही या ट्रस्टने परिसरातील शेकडो गरीब कुटुंबांना आधार दिला होता.

यावर्षी बिलाल मस्जिद ट्रस्टने जकातीतून जमा झालेल्या रकमेतून परिसरातील वीस आदिवासी कातकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन महिने पुरेल इतक्या किराणा मालाची मदत करत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हाजी नूर मोहम्मद सय्यद,तनवीर शेख, मौलाना रफिक सुतार, तनवीर सय्यद, सोहेल शेख, फिरोज खान,मजीद शेख, गुफरान शेख, कदीर शेख, जावेद शेख, आसिफ शेख, नरेंद्र हगवणे आदी उपस्थित होते.

" सकाळ'मुळे आम्हाला या आदिवासी कातकरी समाजाच्या व्यथांविषयी माहिती मिळाली. त्यानूसार आम्ही ट्रस्टच्या वतीने वीस आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत केली आहे.

पवित्र कुराणातील उपदेशानुसार आमची जकात खऱ्या गरजूंसाठी गेली आहे. यापुढेही अशीच मदत करण्यात येणार आहे." नूर मोहम्मद सय्यद, अध्यक्ष, बिलाल मस्जिद ट्रस्ट, खडकवासला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT