shivajirao-adhalrao-patil
shivajirao-adhalrao-patil 
पुणे

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प दृष्टिपथात - शिवाजीराव आढळराव पाटील

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर - बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मध्य रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या प्राधान्याने पूर्ण करावयाच्या प्रकल्प यादीत (पिंक-बुकमध्ये) हा प्रकल्प समाविष्ट करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

या लोहमार्गासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाला तातडीने पूर्ण करण्यासाठी ज्या-ज्या अडचणी आहेत त्यांची सूची पाठविण्याची सूचना केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. १९९५-९६ पासून अनेक चढ-उतार व अनेक सरकारे पाहिलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला २४ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रकल्प परतावा ४.११ एवढा चांगला आल्याने या प्रकल्पाला केंद्र सरकारने होकार देत ५० टक्के राज्य-केंद्र असा निकष लावला. 

दरम्यान, या प्रकल्पाचा डीपीआर रेल्वे बोर्डाने दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवीत या डीपीआरला नुकतीच मंजुरी दिली व हा प्रकल्प पिंक-बुकमध्ये समाविष्ट केल्याचे लेखी स्वरूपात आपल्याला कळविल्याचे आढळराव यांनी सांगितले. पर्यायाने बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ दृष्टिक्षेपात आला असून या प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचेही महारेलने कळविल्याचेही आढळराव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT