Pune Nashik highway  Sakal
पुणे

Pune Nashik highway : पुणे नाशिक महामार्गावर वाहनांची धडक बसून चार दिवसात दोन कोल्ह्याचा बळी; वन विभागाला जाग कधी येणार

चौदा जानेवारी 2023 रोजी सुद्धा याच भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून कोल्हा मृत्युमुखी पडला होता.

सकाळ डिजिटल टीम

रवींद्र पाटे

नारायणगाव - येथील पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून कोल्हा या वन्य प्राण्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याचा सुमारास शॅम्पेन कंपनी जवळ घडली.

चौदा जानेवारी 2023 रोजी सुद्धा याच भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून कोल्हा मृत्युमुखी पडला होता. मागील वर्षभरामध्ये या भागात महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनांची धडक बसून कोल्हा,तरस व पाच बिबट्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.महामार्गावर वाहनाची धडक बसून वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत.

मात्र वन्य प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत वन्यप्रेमी चंद्रशेखर भागवत, हनुमंतराव भापकर यांनी खंत व्यक्त केली आहे.

मागील चार दिवसात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून दोन कोल्हे मृत झाले आहेत. दोन्ही घटना दिवसा झाल्या आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित असता तरया दोन वन्य प्राण्यांचा बळी गेला नसता.मृत झालेल्या कोल्ह्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील. अशी माहिती वनपाल अनिता होले यांनी दिली.

येथील पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव ते चौदा नंबर या पाच किलोमीटर अंतरात डिंभा डावा, मीना शाखा हे दोन कालवे असून पूर्ववाहिनी मीना नदी आहे.या भागात महामार्गाच्या लगत बागायती क्षेत्र आहे. महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूला गणपीर बाबा डोंगर, नारायणगड भागात वनक्षेत्र आहे.

त्यामुळे परिसरामध्ये लांडगा,कोल्हा,तरस, बिबटे,ससा आदि वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. पाणी व भक्ष्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा वावर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असतो. दोन वर्षांपूर्वी बाह्यवळण रस्त्याचे काम झाल्यामुळे महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने जात असतात.

त्यामुळे या भागात अपघातांची संख्या वाढली आहे.मागील वर्षभरामध्ये या भागात महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनांची धडक बसून दोन कोल्हे ,तरस व पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

हा भाग ग्रीन झोन मध्ये येत असल्याने व या भागात वनक्षेत्र असल्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेसाठी राष्ट्रीय महामार्ग व वनविभागाने ती ठिकाणी फलक लावून वाहनांची गती कमी करण्यासाठी किंवा अन्य उपाययोजना केल्यास वन्य प्राण्यांचा मृत्यू टाळता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT