पुणे

Pune Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूलाजवळ भीषण अपघात! , दोन ट्रकची धडक, कार जळून खाक ; सात जणांचा मृत्यू

Massive fire erupts after two containers collide near Navale Bridge in Pune : अपघातात एक कार जाळून खाक झाली असून, अनेक गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे ; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

Mayur Ratnaparkhe

Pune Navale Bridge accident container crash : पुण्यातील नवले पूलाजवळ दोन कंटेनरची एकमेकांना धडक होवून, भीषण अपघात झाला आहे. यामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला आहे. प्राप्त माहितीनुसार अपघात झाल्यानंतर भीषण आग भडकली आणि या आगीत एक कार जळून खाक झाली आहे. तर सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत, मात्र जखमींची संख्या अजून समजली नाही. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. नवलेपूल जवळील गावगाडा हॉटेल समोर हा भीषण अपघात झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका भरधाव ट्रकने अन्य एका ट्रकला धडक दिली मात्र या दोन ट्रकमध्ये एक कार अडकल्याने ती पूर्णपणे चेंदामेंदा झाली. या अपघातानंतर लगेचच आग भडकल्याने कारमधील सर्व नागरिकांचा जळून मृत्यू झाला.

याशिवया, यावेळी आसपासच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले ही वाहनेही एकमेकांवर आदळली गेली आणि अनेकजण जखमी झाले आहेत. संध्याकाळी नवले पूलाच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि या ठिकाणी कायमच अपघात घडत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Zoo : कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकीट महागणार; स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर

Pune News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीला पुन्हा मुदतवाढ

Gondia News : रुग्णवाहिकेला आग; ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; वर्कशाॅपचे नुकसान!

Lohara Bribe News : पाच लाखांची डील पोलिसांना पडली महागात; प्रभारी अधिकाऱ्यासह चार पोलिस निलंबित

Narayangaon Crime : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी जीएमआरटी प्रकल्पातील कंत्राटी कामगारासह दोन जणांना अटक!

SCROLL FOR NEXT