पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी रविवारी लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारला. सैन्यदलात ३९ वर्षे सेवा बजावून असित मिस्त्री आज निवृत्त झाले.
एअर मार्शल कपूर हे एनडीएच्या ६७ व्या तुकडीतील माजी प्रशिक्षणार्थी आहेत. तसेच फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूल, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तर १९८५ मध्ये ते भारतीय हवाईदलात रुजू झाले. आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी विविध विमानाद्वारे सात हजार ८०० तासांहून अधिक मुक्त उड्डाण केले आहे. त्यांनी संरक्षण अभ्यासात एम.एस्सी, मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी आणि एम.फील केले आहे. त्याचबरोबर सध्या ते उस्मानिया विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.
फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून एअर मार्शल कपूर यांनी एअर फोर्स ॲकॅडमी येथे जबाबदारी पार पाडली. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक सराव आणि ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. एअर टू एअर रिफ्यूलिंग (हवाई मार्गाने इंधनपुरवठा), युद्ध कारवाईमध्ये त्यांनी नेतृत्व केले असून याचा चांगला अनुभव त्यांना आहे. ते भारतीय हवाई दलातील हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या कार्यप्रणालीमध्ये त्यांना चांगलाच अनुभव आहे. यासाठी त्यांनी परदेशातून प्रशिक्षण घेतले होते. ‘एअर टू एअर रिफ्यूलिंग’ स्क्वाड्रनच्या प्रमुखपदासह विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना वायुसेना पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.