pune sakal
पुणे

Pune : आपत्कालीन प्रशिक्षितांची संख्या वाढविण्याची गरज; डॉ. डुबे पाटील

हडपसर मेडिकल असोसिएशन व आबणे हॉस्पिटलच्या वतीने "इमर्जन्सी आणि प्रथमोपचार व्यवस्थापन" या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

कृष्णकांत कोबल ------------------------

हडपसर - आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी वाचविणे, दुष्परिणाम कमी करणे आणि उपचाराच्या प्रतीसादासाठी प्रोत्साहित करणे, हा प्रथमोपचारामागील महत्वाचा भाग आहे. त्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा महत्वपूर्ण असून त्यातील प्रशिक्षितांची संख्या वाढविणे अधिक गरजेचे आहे. असे मत डॉ. प्रकाश डुबे पाटील यांनी व्यक्त केले.

हडपसर मेडिकल असोसिएशन व आबणे हॉस्पिटल यांच्या वतीने दरमहा तिसऱ्या किंवा चौथ्या बुधवारी मोफत विशेष शिबीर आयोजित केले जाते. "इमर्जन्सी आणि प्रथमोपचार व्यवस्थापन" या विषयावर शिबीर शृंखलेतील हे ४० वे प्रशिक्षण शिबीर होते. त्याचे उद्घाटन डॉ. प्रकाश डुबे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉ. साकेत टिळेकर म्हणाले, "आपत्कालीन स्थितीमध्ये जीविताला आणि मालमत्तेला धोका आहे. ही परिस्थिती कधीही आणि कुठेही उद्भवू शकते. ती परिस्थिती ओळखणे, तातडीने त्या ठिकाणी पोहोचणे, प्रत्यक्ष जागेवर उपचार करणे, रुग्णवाहिकेतही उपचार करून रूग्णाला योग्य त्या रूग्णालयात पोहोचविणे ह्याचा आपत्कालीन प्रथमोपचारात समावेश होतो. रस्त्यावरील गाड्यांचे अपघात, हृदयाचे आजार, आग लागणे आदी घटनांमध्ये ही गरज महत्वपूर्ण असते.'

डॉ. सचिन आबणे, डॉ.वंदना आबणे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. नागनाथ मस्तुद यांनी या शिबिराचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Price: सणासुदीत नागरिकांना दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर काय?

Mahadevi Elephant: अनंत अंबानीच्या लग्नात हत्तीण तीन दिवस एकाच ठिकाणी उभी... महादेवीचे देखील हाल होणार? पेटाकडे उत्तर आहे का?

Latest Maharashtra News Updates : घातक लेसरवर बंदी; साउंड सिस्टीम टाळा; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Nagpur Crime: लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात; गिट्टीखदान पोलिसांकडून अटक, डझनभर लोकांना अडकवून केली लूट

Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, ‘ब्रिडिंग चेकर्स’ सक्रिय

SCROLL FOR NEXT