Pune chadani chauk latest update  sakal
पुणे

Pune Update: आता चांदणी चौकात अपघातांचं नो टेंशन, प्राधिकरणाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Chandani Chauk : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि 'एमडी इंफ्र' यांच्यातील शेवटच्या टप्यातले कराराचे काम सुरू आहे.

समाधान काटे

Mayur Colony: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात लवकरच पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) उभारला जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. चांदणी चौकातील 'एसटी'चा नवीन बस थांबा ते ईरानी कॅफे बावधन असा शंभर मीटरचा लोखंडी पादचारी पूल असणार आहे.

पादचारी पूलाचे काम कोल्हापूर येथील 'एमडी इंफ्र' या कंपनीला देण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि 'एमडी इंफ्र' यांच्यातील शेवटच्या टप्यातले कराराचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू होईल अशी माहिती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून देण्यात आली.

पादचाऱ्याच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यासाठी 'सकाळ' ने सातत्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत 'सकाळ'ने प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेत 'चांदणी चौकात पादचाऱ्यांचा जीव धोक्यात', प्रवाशांना आणले 'रस्त्यावर' अशा मथळ्याखाली वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केलीत. दररोज हजारो प्रवाशांना स्वता:चा जीव मुठीत धरूण महामार्ग ओलांडावा लागतो.

महामार्गाच्या दूसऱ्या बाजूला जायचे असल्यास तीन किलोमीटर पायी जावे लागते, अन्यथा तीन किलोमीटर अंतरासाठी तब्बल एकशे बीस रूपये मोजून भाड्याने रिक्षा करून जावे लागते. पादचारी मार्ग झाल्यावर सुरक्षीतरित्या पाच मिनटात महामार्ग ओलांडता येईल व प्रवाशांना होत असलेल्या गैरसोईतून सुटका होईल.

प्रवाशांची सुरक्षा व गैरसोय होऊ नये म्हणून, केंद्रीय राज्यमंत्री मुरधीर मोहोळ यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन तात्काळ पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT