Pune Police
esakal
Five new Police Stations in Pune City : पुणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. याचबरोबर पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भरदिवसा खून, लुटमार, मारहाण, छेडछाड आदी गुन्हेगारी घटना घडत असल्याने, पुणेकरांच्या सुरक्षिततेबाबत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
अशावेळी आता पुणे पोलिस प्रशासनाने आपली क्षमता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता पुणे शहरात एकूण पाच पोलिस स्टेशन वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
याचबरोबर पुणे पोलिस दलास दोन नवीन पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील मिळणार आहेत. यासाठी झोन सहा आणि झोन सात असे दोन पोलिस उपायुक्त झोन तयार केले जात आहेत. यामुळे गुन्हेगारी घटनांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
तर याचबरोबर पुण्यात आता पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढवले जाणार आहेत. यामुळे पुणे शहरातील पोलिस स्टेशन्सची एकूण संख्या ही ४५ होणार आहे. नर्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, मांजरी आणि लोहगाव या ठिकाणी नवीन पोलिस स्टेशन्स असणार आहेत. याबाबतचा शासन आदेश लवकरच जारी होणार आहे.