Nagpur stray dogs Sakal
पुणे

Pune News : पुण्यात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; हल्ल्यात ५ वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

या हल्ल्यानंतर परिसरातले रहिवासी महानगरपालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद मांडलेला असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांचा एक चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पुण्यातल्या वडगाव शेरी परिसरातल्या सनसिटीमध्ये ही घटना घडली आहे. अनिरुद्ध जोंधळे नावाचा पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री आहेत. ते अनेकदा धावत्या गाडीमागे पळताना दिसतात.

ही कुत्री लहान मुलांवर तसंच इथल्या नागरिकांवरही हल्ला करत आहेत. भटक्या कुत्र्यांनी अनिरुद्धवर हल्ला केल्यानंतर सनसिटीमधले रहिवासी रस्त्यावर उतरले होते. या नागरिकांनी येरवडा पोलिस ठाण्यामध्ये जाऊन अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाय करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT