पुणे

आकुर्डीत IPL मॅचवर सट्टा लावणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक केली आहे. श्रीपाद मोहन यादव (वय २२, रा. पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय ३५, रा. निगडी), नितीश रामदास काळे (वय २१, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर किशोर रेहाल उर्फ किशोर भाई रा. चेंबूर मुंबई याच्यावर गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी पोलिस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकुर्डी परिसरात काही व्यक्ती पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लोटस ऑनलाइन सट्टा हा जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचतारानगर ते गंगानगर परिसरात शुक्रवारी (ता. १६) रात्री पावणे दहाच्या सुमारास सापळा लावून कारवाई केली असता आरोपी ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत असताना आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करीत गोंधळ घातला. तसेच दहशतीचे वातावरण तयार करून पोलिसांच्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT