supriya sule  sakal
पुणे

Pune News : बारामतीत शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अँड. संदीप गुजर

बारामतीचे माजी नगराध्यक्ष विनोदकुमार गुजर यांचे चिरंजिव अँड. संदीप गुजर यांची राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

मिलिंद संगई, बारामती..

बारामती - राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी भाजप सेनेच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत आपल्या गटाची पक्षबांधणी जोमाने सुरु केली आहे.

बारामतीचे माजी नगराध्यक्ष विनोदकुमार गुजर यांचे चिरंजिव अँड. संदीप गुजर यांची राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. काही दिवसांपूर्वीच अँड. एस.एन. जगताप यांना तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

दरम्यान अँड. राजेंद्र काटे देशमुख यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदाची तर प्रशांत बोरकर यांना बारामती तालुका युवकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय घेतला. पक्षात दोन गट पडल्यानंतर बारामतीत अजित पवार यांच्याकडे वर्चस्व असल्याचे चित्र होते.

आता मात्र राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच बारामतीतही शरद पवार यांनी पक्षबांधणी नव्याने सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. आगामी निवडणूकांमध्ये हा गट नेमकी काय भूमिका घेणार या कडे सर्वांचेच लक्ष आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत तरी शरद पवार गटाने सक्रीय सहभाग नोंदविला नाही. मात्र आगामी काळात होणा-या निवडणूकांमध्ये हा गट सक्रीयपणे सहभागी होईल, अशी चिन्हे आहेत.

दरम्यान बारामती शहरात पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच बूथ कमिट्यांची रचना करुन प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची नियुक्तीचे उद्दीष्ठ ठेवल्याचे अँड. संदीप गुजर यांनी निवडीनंतर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

IND vs SL Test Squad: सारांश जैनच्या निवडीनंतर एक नाव पुन्हा चर्चेत आले... ७०००+ धावा, ५००+ विकेट्स घेऊनही त्याला टीम इंडियाने कधीच नाही खेळवले; कोण आहे तो?

Latest Live Updates Marathi : सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत- आदित्य ठाकरे

Saransh Jain: वडिलांनी मुलासाठी कॅन्सरच लपवला! आज तोच खेळाडू टीम इंडियात; भावूक कहाणी डोळे पाणावेल

World Hepatitis Day 2026: फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी असू शकतात का? डॉक्टर काय सांगतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT