पुणे

'भास्कर चंदावरकर म्हणजे "ज्ञानकोश'च'

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""चित्रभास्कर' पुस्तक हातात घेतले आणि कैक वर्षांनी पुन्हा एकदा भास्करची गाठ पडली. खरंतर आम्ही पूर्वी अनेकदा भेटत असू. आमची आरे-तुरेची दोस्ती होती. एकमेकांच्या घरी रसिल्या मैफली व्हायच्या. हास्यविनोद अन्‌ गप्पांना अक्षरश: ऊत येत असे. कुठली माहिती-शंका विचारली की भास्कर आपला समृद्ध खजिना वाटायला सतत तयार असे. पार खोलात शिरून अतिशय रसाळ पद्धतीने विषयाचे विश्‍लेषण करून भास्कर समोरच्याला गुंगवून सोडत असे. तीच खासियत "चित्रभास्कर' उघडताच अनुभवायला मिळाली...'', अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे प्रतिभावंत संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्याबद्दल भरभरून बोलत होत्या. 

दिवंगत संगीतकार पं. भास्कर चंदावरकर यांनी "सिनेमा आणि त्याचे संगीत' या विषयावर लिहिलेल्या विविध लेखांवर आधारित "चित्रभास्कर' पुस्तकाचे प्रकाशन परांजपे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय आणि राजहंस प्रकाशनाच्या या सोहळ्यात चित्रपट अभ्यासक अरुण खोपकर, प्रकाशक दिलीप माजगावकर, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, "आशय'चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, अनुवादक आनंद थत्ते उपस्थित होते. प्रत्येकांनी चंदावरकर यांच्या आठवणी उलगडत ते "ज्ञानकोश'च होते, अशा भावना या वेळी व्यक्त केल्या. 

परांजपे म्हणाल्या, ""संगीत हा माझा प्रांत नसला तरी साहित्य हा माझा प्रांत आहे. शब्द माझे साथी आहेत. दैनंदिन व्यवहारात काही विशेष ताकदीचे शब्द आडवे आले तर मी थबकते. त्यांचा यथायोग्य समाचार घेते. त्यांचा मान राखते. "चित्रभास्कर' हे पुस्तक हातात पडले अन्‌ मी स्तिमित झाले. आव्हान उभे केले. चित्रपटात संचार करणारी, लेखन-दिग्दर्शन करणारी आणि स्वत:ला कलाप्रेमी मानणारी मी संगीतापासून वंचित कशी राहू शकते, असा खडा सवालच या पुस्तकाने माझ्यासमोर उभा केला.'' भास्करबद्दल मी काहीशी दबून असायचे. पंडित रविशंकर यांचा तो खास चेला. अतिशय श्रेष्ठ असा पहिल्या दर्जाचा सतारवादक आणि संगीताच्या क्षेत्रातला प्रकांड पंडित; पण मी फार कोणी नव्हते. त्यामुळे मला काहीसा न्यूनगंड वाटायचा. तरीसुद्धा आमच्यात मैत्री होती. त्यांनी माझ्या दोन बालचित्रपटांना संगीत दिले होते. हे फारसे कोणाला माहिती नाही, असेही त्या म्हणाल्या. 

सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या अभिवाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

...त्यामुळे संगीत थांबले 
""वयाच्या आठव्या वर्षी मी संगीताच्या प्रांताला दुरावले. माझ्या आईचे संगीतावर, विशेषत: शास्त्रीय संगीतावर अतोनात प्रेम होते. आमच्या घरातील दिवाणखान्यात वेगवेगळ्या गायकांच्या मैफली व्हायच्या. मलाही गाणे यावे, या उदात्त हेतूने आईने माझी वयाच्या सातव्या वर्षी शिकवणी लावली. गुरुजी दररोज सकाळी शिकवायला यायचे. वर्षभर हा "रियाज' सुरू होता; पण माझी राग आसावरीच्या पुढे मजल गेली नाही. त्यामुळे संगीत थांबले'', असे गुपितही परांजपे यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT