बस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल
बस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल 
पुणे

बस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणेः बस इच्छित स्थळी न थांबवल्याने वाद होऊन पोलिस कर्मचा-याने पीएमपीएल बस वाहकास मारहाण केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱया विरूद्ध औंध पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. 5) रात्री एमएच 14, सीडब्लू 2163 या बसमध्ये जगताप डेअरी ते बॉडीगेट पोलिस कर्मचारी वसाहत येथे येण्यासाठी पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ हे  बसले होते. बॉडीगेट थांब्यावर बस न थांबल्याने धुमाळ यांनी बसची घंटा वाजवली. यावरून धुमाळ व बसवाहक दत्तात्रेय प्रल्हाद जायभाय यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने पोलिस कर्मचारी यांनी आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिस कर्मचा-याने मारहाण केल्याने बसवाहक दत्तात्रेय जायभाय यांच्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ यांच्या विरोधात औंध पोलिस चौकित गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी धुमाळ हे हिंजवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून ते औंध येथे बॉडीगेट पोलिस वसाहतीत राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT