Care-Taker
Care-Taker 
पुणे

‘केअर टेकर’बाबत दक्षता

सकाळवृत्तसेवा

पुणे - वृद्धांना त्यांच्या घरी योग्य सेवा मिळावी, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या स्वभावानुसार त्यांना सांभाळून घेणे, यांसह विविध बाबींवर ‘केअर टेकर एजन्सी’ अधिक भर देऊ लागल्या आहेत. ‘केअर टेकर’ला योग्य प्रशिक्षण, त्यांची वैयक्तिक पडताळणी करण्याबरोबरच आता काही संस्था ‘केअर टेकर’ची माहिती पोलिसांना देण्यासाठी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

वृद्ध महिला व ‘केअर टेकर’मध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ‘केअर टेकर’ने वृद्ध महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच शहरात घडला. या पार्श्‍वभूमीवर ‘केअर टेकर एजन्सी’च्या पडताळणीची यंत्रणाच नसल्याच्या प्रश्‍नावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला. त्या वेळी काही ‘केअर टेकर एजन्सी’ वृद्धांच्या आरोग्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेत असल्याचेही आढळले.

शहराच्या विविध भागांमध्ये अशा संस्था सध्या कार्यरत आहेत. या संस्था आपल्याकडील ‘केअर टेकर’ची वैयक्तिकरीत्या योग्य प्रकारे पडताळणी करण्याबरोबरच त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देत असल्याचेही आढळले.
शहरामध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सात लाखांहून अधिक आहे.

त्यांना वृद्धत्व, आजारपण इत्यादी कारणांमुळे घरगुती कामे करता येत नाहीत. तसेच, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना औषधोपचार, अंघोळ, जेवण, फिरायला घेऊन जाणे, वृत्तपत्र वाचून दाखविणे यांसारखी कामे करण्यासाठी ‘केअर टेकर’ची गरज भासते. त्यादृष्टीने आपल्या घराजवळील, ओळखीच्या  ‘केअर टेकर एजन्सी’कडून सेवा शुश्रुषा करण्यासाठी कामगार मागविले जातात. हे कामगार निर्व्यसनी, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेले आणि वृद्धांची मनापासून सेवा करणारे असणे आवश्‍यक असते. तसाच बहुतांशी एजन्सींचा प्रयत्नही असतो.

याविषयी ‘सिद्धिविनायक केअर टेकर एजन्सी’च्या जबीन शेख म्हणाल्या, ‘‘वृद्धांना ‘केअर टेकर’कडून चांगली सुविधा मिळण्याची अपेक्षा असते. त्यादृष्टीने आम्ही आमच्या ‘केअर टेकर’ची वैयक्तिकरीत्या पडताळणी करून त्यांची महत्त्वाची कागदपत्रे ठेवतो. वृद्धांशी कसे वागावे, बोलावे, त्यांची काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाते. तसेच, वृद्धांच्या सेवेसाठी त्यांना चांगला पगारही दिला जातो.’’

‘ॲडवर्क नेचर क्‍युअर सेंटर’चे डॉ. महेश अडवळकर म्हणाले, ‘‘आम्ही ‘केअर टेकर’ची पार्श्‍वभूमी, त्याचा अनुभव, शिक्षण, कौटुंबिक परिस्थितीची बारकाईने पडताळणीस प्राधान्य देतो. ‘केअर टेकर’ व सेवा घेणारे वृद्ध यांचे स्वभाव जुळले की, नंतर कुठलेच प्रश्‍न उद्‌भवत नाहीत.’’ आपल्याकडील ‘केअर टेकर’ संबंधी पोलिसांशी संवाद वाढविण्यास प्राधान्य देणार असल्याचे काही संस्थांनी सांगितले. पाच हजारांहून अधिक ‘केअर टेकर’ असलेल्या एका संस्थेनेही आपण केअर टेकरच्या पडताळणीकडे दुर्लक्ष केले जात नसल्याचे स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT