pmc sakal
पुणे

Pune News : मनपा बिगारी-सफाई कर्मचाऱ्यांचा गैरवापर - क्रांतीवीर सेनेची तक्रार

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात भोंगळ कारभार उघडकीस

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - क्षेत्रीय कार्यालयाच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना खाजगी व इतरत्र कार्यालयीन कामकाज देऊन त्या कर्मचाऱ्यांचा गैर वापर केला जात असल्याची तक्रार क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष मनोज क्षीरसागर, उपाध्यक्ष नितीन वायदंडे, कार्याध्यक्ष विजय मोहिते यांनी केली आहे.

यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बिगारी व सफाई सेवक या मूळ हुद्द्यावर नियुक्त असलेल्या सुमारे 40 ते 50 या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी नियुक्त्या कार्यालयीन कामकाज करण्यासाठी केल्या आहेत. सदर माहिती माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.

यावेळी सकाळ प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बिगारी व सफाई कर्मचारी हे त्यांच्या मूळ ठिकाणी काम करत नसून, कार्यालयातील सहायक आयुक्त कार्यालय, आस्थापना, विद्युत, स्थापत्य, भवन विभाग, स्टोअर, गवणी, टपाल, विवाह नोंदणी, पेन्शन या आदी विभागात हे कर्मचारी संगणकावरील टायपिंग करणे, चहा, पाणी, नाष्टा, डबे, फाईल आणणे तसेच आदी खाजगी काम करत असल्याचे आढळून आले.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, घाणीचे काम करणाऱ्यांना घाण भत्ता दिला जातो, लाड पागे समिती शिफारस घाण भत्ता वारस प्रमाणे यांच्या नियुक्त्या आहे. मात्र, कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांना घाण भत्ता का दिला जात आहे. मूळ पदावर कार्यरत असणारे कर्मचारी कार्यालयामध्ये काम कोणाच्या आशीर्वादाने करीत आहेत.

कार्यालयीन अधीक्षक आणि सहायक आयुक्त यांना याबाबत माहिती नाही का, या सेवकांना राजकाऱ्यांचा वरदहस्त आहे का, असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला कुठलाही प्रकारे घाणीचे काम येत नाही. कार्यालयीन काम करणे त्यांचा मूळ हुद्दा नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मूळ मुद्द्यावर करण्यात याव्या अशी मागणी ही संघटनेने केली आहे.

दरम्यान भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे म्हणाल्या की, मागिल दहा वर्षापासून अनेक बिगारी सेवक या कार्यालयात कार्यरत असून, त्यांच्या तक्रारी दाखल आहेत. मूळ पदावर काम न करता कार्यालयात काम करणाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक बिगारी सेवक त्यांच्या हुद्द्यावर काम करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधी लवकरच बैठक तातडीने करावाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच अतिरिक्त मनपा आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्यांना ज्या हुद्द्याचे काम आहे त्यांनी तेच केले पाहिजे. मला ही माहिती आताच समजली आहे. त्यामुळे पुढील तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Discount Offer : लवकरच वाढणार iPhone 17 Pro Max ची किंमत! त्याआधी मिळतोय बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी गर्दी, 'इथे' सुरुय ऑफर

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी - उद्धव ठाकरे

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

SCROLL FOR NEXT