Road
Road 
पुणे

जीवघेणा मार्ग

सकाळवृत्तसेवा

बोपोडी ते अंडी उबवणी केंद्र रस्त्याची दुरवस्था
पुणे - वार मंगळवार, वेळ दुपारी ठीक १.५७ ची, स्थळ खडकी रेल्वे स्थानकासमोरील रस्ता. याच रस्त्याच्या कडेला थांबलेली एक वृद्ध व्यक्ती दुचाकीला ‘किक’ मारून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर गाडी चढविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात काँक्रीट रस्त्याच्या ‘कडा’ला लागून गाडी घसरते आणि वृद्ध व्यक्ती रस्त्यावर जोरदार आपटते. दैव बलवत्तर पाठीमागून मोठे वाहन नव्हते, परंतु ही संधी त्या दोन नागरिकांना मिळाली नाही. रस्त्याच्या कडेला थांबूनही त्यांना जीव गमवावा लागला. बोपोडी ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतचा रस्ता व त्याभोवतीच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटना घडूनही रस्ता दुरुस्तीबाबत महापालिका व खडकी कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसच्या राजा बंगला स्थानकावर डिकीचा दरवाजा अचानक उघडल्याने झालेल्या अपघातात दीपक सोरटे व जॉर्ज आशीर्वादन या दोघांना जीव गमवावा लागला, तर आरोग्यदास स्वामी हे गंभीर जखमी झाल्याची घटना मागील सोमवारी घडली होती. याच रस्त्यावर आणखी एक दुर्घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर अंडी उबवणी केंद्र ते बोपोडी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर धक्कादायक परिस्थिती समोर आली.

यामुळे जीवघेणा ठरतोय रस्ता
 रस्ता दुभाजक कमी उंचीचा
 रिफ्लेक्टरचा अभाव
 उचकटलेले पेव्हिंग ब्लॉक्‍स, रस्ते
 मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे
 काँक्रीटचा रस्ता संपलेल्या ठिकाणी तयार झालेले ‘कट’

रस्ता-पेव्हिंग ब्लॉक्‍समध्ये चढ-उतार
अंडी उबवणी केंद्रापासून खडकी कॅंटोन्मेंटची हद्द सुरू होते. रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजक एक फूट उंचीचादेखील नाही. त्यामुळे अनेकदा वाहने दुभाजकावर चढत किंवा घासत असतात. येथून ते जयहिंद चित्रपटगृहापर्यंतचा रस्ता काँक्रीटचा बनविला; मात्र चढ-उताराबरोबरच रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याला पेव्हिंग ब्लॉकची जोड दिल्याने काँक्रीटचा रस्ता व पेव्हिंग ब्लॉक्‍समध्ये चढ-उतार तयार झाले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरून नागरिक रस्त्यावर पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काँक्रीटचा रस्ता संपत असलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या मोठ्या फटीमुळे अपघातात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

वाहन प्रवेश शुल्क केंद्रामुळे कोंडी
सर्वत्र विहाराकडून उस्मान मार्गाकडे जाताना, दारूगोळा कारखाना रुग्णालय, खडकी हॉकी मैदान या ठिकाणच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुभाजकच नाहीत. महामार्गाला थेट अंतर्गत रस्ते जोडल्याने अपघाताची घटना घडण्याची दाट शक्‍यता आहे. याच रस्त्यावर खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश शुल्क आकारणी केंद्र असून, तेथे रस्त्यावरच वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पोस्ट ऑफिसजवळील वाहन प्रवेश शुल्क केंद्राजवळ गतिरोधकाचे डांबर पसरल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. खडकी पोलिस ठाणे ते खडकी रेल्वे स्थानकापुढील रस्त्याभोवतीच्या परिसरातून खड्ड्यांमधून वाहन चालविताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

ब्लॉक्‍स, रस्त्यालाही खड्डे
अंडी उबवणी केंद्र ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग ब्लॉकचा वापर केला आहे. अनेक ठिकाणी हे ब्लॉक तुटलेल्या अवस्थेत आहेत. पेव्हिंग ब्लॉक्‍स व काँक्रीटच्या रस्त्यालाही खड्डे पडले आहेत. या ब्लॉकचा वापर केलेल्या बहुतांश चेंबरची झाकणे वर आल्याने दुचाकीस्वारांचा गोंधळ उडून अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत.

अंडी उबवणी केंद्र ते खडकी रेल्वे स्थानकापर्यंतचा सर्व रस्ता खराब आहे. चढ-उतार व रस्त्याच्या कडांमुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. खराब रस्त्यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला. हा रस्ता कॅंटोन्मेंटच्या हद्दीत आहे; मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती पुणे महापालिकेकडे आहे. कॅंटोन्मेंटच्या अभियंत्यांशी चर्चा करून हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त व मुख्य अभियंत्यांना पत्र देण्यात येणार आहे.
- अभय सावंत, उपाध्यक्ष, खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड.

शिवनेरी बसचा अपघात वाहनचालकाच्या चुकीमुळे झाला आहे. मात्र, रस्ता खराब आहे, हेदेखील नाकारता येणार नाही. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे आम्ही पाठपुरावा केला आहे. स्मार्ट सिटी व मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्‍यता आहे.
- जितेंद्र कोळी, पोलिस निरीक्षक, खडकी वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT