पुणे

सरदार पटेल रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा कार्यान्वित 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अब्बासभाई कादरभाई अब्दुजी ट्रस्टने पुणे कॅंटोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास दिलेली अत्याधुनिक दर्जाची डायलिसिस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय कॅंटोन्मेंट प्रशासनाने दीड वर्षापूर्वीच घेतला होता. त्यासाठी अब्बासभाई कादरभाई अब्दुजी ट्रस्टने अत्याधुनिक व अद्ययावत दर्जाचे पाच डायलिसिस यंत्र दिले होते; मात्र यापूर्वीच्या रुग्णालय प्रशासनाने ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष केले होते. डॉ. विद्याधर गायकवाड यांनी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तत्काळ डायलिसिस केंद्र तयार केले. ट्रस्टचे अध्यक्ष फिरोज पूनावाला, विश्‍वस्त हैदर पूनावाला, सचिव कैझर पूनावाला व डॉ. गायकवाड यांच्या उपस्थितीत हे केंद्र सुरू केले. या केंद्रामध्ये एकावेळी पाच रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे. वैद्यकीय अधिकारी, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉक्‍टर व तांत्रिक कर्मचारी या केंद्रामध्ये असणार आहेत. 

डॉ. गायकवाड म्हणाले, ""पूनावाला यांच्याकडून डायलिसिसची पाच यंत्रे मिळाली असून, त्याबदल्यात शंभर रुग्णांवर मोफत उपचार करण्याची तरतूद त्यांनी केली आहे. रुग्णांची गर्दी वाढल्यास आणखी पाच यंत्रे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.'' 

पूनावाला म्हणाले, ""सामाजिक प्रश्‍नांची गांभीर्याने दखल घेत ते सोडविण्याला ट्रस्टने प्राधान्य दिले आहे. गरीब व गरजू रुग्णांवरही चांगले उपचार व्हावेत, यासाठी ट्रस्टने रुग्णालयास ही यंत्रणा दिली आहे.'' 

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT