pune news  sakal
पुणे

Pune News : गणेश उत्सवात अक्षेपार्ह देखावे नको ,धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल असा उत्सव साजरा करा-पोलीस उपविभागीय अधिकारी

जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड आहे त्यामूळे प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या

पराग जगताप

ओतूर - गणेश उत्सवात अक्षेपार्ह देखावे साजर करू नये,समाजातील धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल असा उत्सव साजरे करावा,कायद्यात सणाचे पावित्र साभाळू आनंद घ्या,आपल्या धार्मिक रूदी परंपरा जपा,गुलाला व डॉल्बी,डिजे फ्री उत्सव साजरा करुन समाजात आदर्श निर्माण करा असे आवाहन जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांनी केले.

ओतूर ता.जुन्नर येथिल पोलिस ठाण्या अंतर्गत गणपती उत्सवांच्या पार्शभुमीवर शनिवारी सायंकाळी क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष,सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या बैठकीत रविंद्र चौधर हे मार्गदर्शन करत होते.

यावेळी ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,ओतूर सरपंच प्रशांत डुंबरे,माजी उपसरपंच प्रेमानंद अस्वार,पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,संतोष डुंबरे, अभी वल्हवणकर, स्वप्नल अहिनवे,दिपक पावडे,विष्णू काळे,मनोज चौधरी,संतोष चौधरी,निलेश महाले,पप्पू लोखंडे व पोलीस पाटील किरण भोर,राजेंद्र लोहोटे,अमित ठोसर,विजय पावडे,विलास बटवाल,राहुल हांडे,पोलीस हवालदार महेश पटारे,रोहित बोंबले व इतर उपस्थित होते.

चौधर पुढे म्हणाले पारंपारिक वाद्याचा वापर करावा, मिरवणूक मागे पुढे घेण्यावरून वाढ करू नये,वर्गनीला जबरदस्ती करू नका तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल केले जाईल,गणपती स्टेज ने वाहतुकीला अडथळा होऊ नये,विज जोड वीज कंपनीकडून घ्यावी,जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड आहे त्यामूळे प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या

शक्य झाल्यास शाडूच्या मुर्ती वापरा तसेच प्लास्टिकचा वापर टाळा,ध्वनी प्रदुषण टाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करा.अनोळखी वस्तू व व्यक्ती बाबत दक्ष रहावे,आपणही सिव्हील ड्रेस मधील पोलीस आहोत.सजग राहून अनुचित प्रकार टाळा.पोलीसांच्या सुचनाचे पालन करा.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे म्हणाले अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम समाजाचा ईदे मिलाद ही त्याच दिवशी आहे.मात्र मुस्लिम समाजाने ईदे मिलाद त्या दिवशी न साजरा करता अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक गणेश उत्सव कायद्याच्या चौकटीत आनंदाने साजरा करावा काही अडचण असल्यास पोलीसांशी संपर्क करा.सार्वजनिक गणपती जवळ सी सी.टि.व्ही.कॅमेरा लावावेत तसेच चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित हवे त्याची माहिती पोलीसांना द्या.विसर्जन मिरवणूकीत वेळेचे बंधन पाळा,निष्णात पोहणारे विसर्जन स्थळी तैनात करावे.उत्सव काळात पोलीसांना सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT