lalit patil sakal
पुणे

Pune News : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह १४ साथीदारांवर मोक्का

अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललित अनिल पाटील (वय ३७, रा. अक्षरधारा सोसायटी,

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललित अनिल पाटील (वय ३७, रा. अक्षरधारा सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (वय ३९, रा. ओशिवरा, मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी साह ऊर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहू रस्ता, जि. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ), भूषण अनिल पाटील (वय ३४, रा. मातोश्रीनगर, नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (वय ३१, रा. विजय ॲनेक्स, नाशिक), रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय २६, रा. धारावी, मूळ रा. अयोध्या), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा अरुण माहिरे (वय ३९ रा. विंग स्पेसेस सोसायटी, नाशिक), झिशान इक्बाल शेख (वय ३३, रा. फ्रेंड्स कॉलनी, नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, रा. एकतानगर, नाशिक), राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी (वय ३०, रा. विरार, मूळ रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे.

तसेच या गुन्ह्यात समाधान बाबाजी कांबळे (रा. नांदूर, नाशिक), इम्रान शेख ऊर्फ आमीर खान (रा. धारावी, मुंबई), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय २९, रा. बोईसर, मुंबई) अद्याप फरार आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ललित दोन ऑक्टोबरला ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नई परिसरातून अटक केली होती. ललित आणि लोहरेने गेल्या १० वर्षांत अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे या टोळीविरुद्ध मोका कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर ललितसह साथीदारांविरुद्ध मोका कारवाईचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT