pune drink and drive sakal
पुणे

Pune News: शहरात रात्री मद्यपींची वाहने सुसाट, पोलिस कारवाई करणार?

सकाळ वृत्तसेवा

Pune News: शहरात रात्री मद्य सेवन करून प्रमुख रस्त्यांवर वाहने भरधाव चालविण्याच्या घटना सर्रास दिसून येत आहेत. अशा मद्यपी वाहनचालकांमुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी अशा मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरात रात्री मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच, बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रात्री रस्त्यावर वाहतूक पोलिस नसतात.

रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांकडूनही अशा भरधाव वाहनचालकांवर कारवाई केली जात नाही. रात्री मद्यपींच्या सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’ अंतर्गत कारवाई वाढविण्याची गरज आहे.

साडेचार महिन्यांत ४७९ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई -

शहरात मद्य सेवन करून गाडी चालविणाऱ्या एक हजार ७८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांतील ही कारवाई असून, गेल्या साडेचार महिन्यांत ४७९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्ष- ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई

२०२२- ३७

२०२३- ५६२

१९ मे २०२४ अखेर- ४७९

अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतूक पोलिसांकडून २०२३ मध्ये विनापरवाना वाहन चालविणाऱ्या १६ वर्षांखालील ४८ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली. तर, २०२४ मध्ये १९ मेअखेर २६ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT