electricity
electricity 
पुणे

पुणे: वीजेचे खांब कोसळल्याने मावळातील वीजपुरवठा खंडीत

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील इंगळूण जवळ महावितरणचे तीन वीजवाहक खांब कोसळून पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, सुदैवाने हे खांब गुरूवारी पडल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा मोठी आपत्ती ओढवली असती. महावितरणचे गंजलेले वीजवाहक खांब, उघडे डीपी बाॅक्स, लोबकळलेल्या तारा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी नादुरूस्त बाबी महावितरणच्या निदर्शनास आणून दिले आहे, परंतू अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, कर्मचारी नागरिकांच्या कामांना प्राधान्य न देता परिसरातील खाजगी फाॅर्म हाऊसेस वर अधिक मेहरबान आहे. चाळीस वर्षापूर्वी महावितरणने आंदर मावळात रोवलेले वीज खांब गंजले आहे,त्यांच्या पायथ्याला लहान मोठी छिद्र पडली आहे. वा-याच्या हेलकाव्यात जीर्ण खांब कधीही कोसळून पडू शकतात, याची कल्पना मनसेचे तालुका संघटक संतोष मोधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी महावितरणला लेखी निवेदन देऊन कळविले होते. या आशयाचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. 

परंतू महावितरणने त्याकडे कानाडोळा करीत दुर्लक्ष केले, गुरूवारी सबंध आंदर मावळातील वीज पुरवठा बंद असतो. त्याच दिवशी दुपारी इंगळूण जवळचे तीन खांब भुईसपाट झाले. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती घेतली तर गावकुसा बाहेरील माळरानात वीजवाहक पडल्याचे समजले.मनसेने महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत वीजवाहक खांब बदलण्याची पुन्हा मागणी केली. महावितरणने तातडीने खांब बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT