पुणे

Pune News: कर्वे रोडवर दुर्दैवी अपघात; क्रेनखाली येऊन सायकलस्वाराचा मृत्यू

Nal stop chouk Cyclist dies: नळ स्टॉप चौकात एक भीषण अपघात झाला आहे. वाहनाच्या धडकेमध्ये एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- नळ स्टॉप चौकात एक भीषण अपघात झाला आहे. वाहनाच्या धडकेमध्ये एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. सकाळी सायकलस्वाराला क्रेनने चिरडल्याची माहिती आहे. यात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल समोर एका सायकल स्वाराचा मृत्यू झाला. डेक्कनच्या दिशेने निघालेल्या या सायकल स्वाराला क्रेनने चिरडले.

प्रत्यक्षदर्शी राजेंद्र नेवासकर, केतन दहिभाते, गणेश शेराल यांनी सांगितले की सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कर्वे रस्त्यावर सध्या पदपथ व सायकल मार्गाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता आता अरुंद झाला असून वाहनांची संख्या सकाळ व संध्याकाळच्या वेळेस जास्त असते. उड्डाणपूलावरून वेगाने गाड्या येत असतात अशा वेळी सायकल स्वरांना रस्त्याने चालवणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे

डेक्कन पोलीस अधिक तपास करत असून क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त सायकलस्वाराचे नाव अद्याप समजले नाही. मात्र, सायकलस्वाराच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT