पुणे

गर्दीच्या दिवशी ‘आवाज वाढव डीजे’

सकाळवृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवात कमी गर्दी होणाऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याची चूक अखेर जिल्हा प्रशासनाने दुरुस्त केली. आता गौरी विसर्जनानंतर उसळणाऱ्या सातव्या, नवव्या आणि दहाव्या तसेच विसर्जनाच्या बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या आधीच्या निर्णयानुसार दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसरा आणि पाचवा दिवस फारसा गर्दीचा नसतो. त्यामुळे आता गर्दी उसळणाऱ्या दिवसांचा समावेश त्यात करण्यात आल्याने पुणेकरांना उत्सवाचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटता येईल. 

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या ‘ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम, २०००’, च्या कलम ५ (३) नुसार ध्वनिवर्धकच्या वापरासंदर्भात ‘आवाजाची मर्यादा’ राखून सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंतची सूट देण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार, यंदाच्या वर्षी गणशोत्सवामध्ये गौरी विसर्जनाचा सातवा दिवस (ता.३१), नववा दिवस (ता.२ सप्टेंबर), दहावा दिवस (ता.३ सप्टेंबर) तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी (बारावा दिवस) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. 

आणखी एक दिवस मिळणार?
ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर वर्षातील १५ दिवसांचे अधिकार दिले आहेत. त्यापैकी अन्य धार्मिक सणांमध्ये पाच दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांपैकी चार दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामध्ये नवरात्री उत्सवाचे दोन दिवस, दिवाळीचा एक दिवस, ख्रिसमसचा एक, ३१ डिसेंबरचा एक या दिवसांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आणखी एक दिवस राखीव आहे. 

या दिवशी वाढणार आवाज    
३१ ऑगस्ट सातवा दिवस (गौरी विसर्जन)
२ सप्टेंबर नववा दिवस (विसर्जन)
३ सप्टेंबर दहावा दिवस 
५ सप्टेंबर बारावा दिवस (अनंत चतुर्दशी)
ध्वनिवर्धकासाठीचे नियम व अटी 
चार दिवसांमध्ये सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी
ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार विहित ध्वनी मर्यादेत ध्वनिवर्धक वाजविणे बंधनकारक 
‘झोनिंग’प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये
ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामग्री आवश्‍यक त्या ठिकाणी लावणे बंधनकारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT