corona in gym
corona in gym 
पुणे

कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता पुन्हा कोरोनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. 'जान है तो जहान है' या उक्तीनुसार जीव राहीला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे राज्याच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल त्यात व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यातील व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासह महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनेचे अध्यक्ष निखिल राजपुरीया, करण तलरेजा, अभिमन्यू सावळे, योगिनी पाटील, गुरूजीत सिंह, शालिनी भार्गव आदींनी सहभाग घेतला होता. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "व्यायाम शाळा-जिम चालकांना यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र आता आपण गतवर्षीच्या पुर्वपदापेक्षाही जास्त बिकट परिस्थितीकडे गेलो आहोत. जिममध्ये तुम्ही सर्व सुविधा आणल्या, ट्रेड मिल आणल्या, उपकरण आली, पण चांगला प्रशिक्षक नसेल, तर काय होईल, तशीच स्थिती आता निर्माण होऊ शकते. सध्या सर्व यंत्रणा कोरोनावर काम करते आहे. रुग्ण शोधणे, त्यांचे ट्रँकीग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगसाठी आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा अथकपणे प्रयत्न करताहेत. कोरोनाच्या विरोधात एकजुटीने काम करावे लागेल. हे काम एकतर्फी होऊ शकत नाही. परिस्थिती अशीच राहीली, तर राज्य गर्तेत जाईल. यापुर्वीही निर्बंध हळूहळू लावले होते, आणि पुन्हा हळूहळू शिथील केले होते. पुन्हा तशी वेळ राज्यात आल्यास सगळ्यांनी शक्तीनिशी सहकार्य करावे."
असोसिएशनचे अध्यक्ष राजपुरिया म्हणाले, "ऑक्टोबरपासून जिम सुरु झाले, त्यावेळीपासून आतापर्यंत दिलेल्या एसओपीचे पालन केले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपल्याकडून यापुढे दिल्या जाणाऱ्या निर्देशाचे जरूर पालन करू."
"जिम संचालक एसओपीचे पालन करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. बहुतांश जिम या छोट्या जागेत आहेत आणि त्याठिकाणी संक्रमण होण्याची शक्यता आहे. अनेक शहरात तज्ज्ञ डॉक्टर्स, आणि उपकरण उपलब्ध नाही. त्यामुळे ही गोष्टही जिम चालकांनी लक्षात घ्यावी आणि राज्यसरकारला सहकार्य करावे.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT