संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
पुणे

दुहेरी हत्याकांड, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अटकेत

संदीप जगदाळे

हडपसर : दुहेरी हत्याकांड, आंतरराज्य घरफोडी, जबरी चोरीच्या अनेक गुन्ह्यांत सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र व सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सागरसिंग सुरजसिंग उर्फ फंटयासिंग अंधरलेले-बाबरी (वय २०, मुळ गाव रा. भिमनगर, जालना, सध्या रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तो हडपसर येथील म्हाडा कॉलनीतील जीतकर कर्तारसिंग कौर भोंड यांच्या घरात राहत होता. त्याला जळगाव जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते.
बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक सयाजी गवारे व अजय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रामटेकडी येथील स्मशानभूमीजवळ सागरसिंग ह्याला धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले. त्याच्यावर चाळीस गाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांड, तेलंगणा राज्यातील पिठलम पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चो-या, जालना जिल्ह्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून तो तडीपार आहे, अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी त्याने केली असून त्यातील चार तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिस तपास पथकातील रमेश भोसले, युवराज दुधाळ, सुदर्शन बोरवके, ज्ञानेश्र्वर दिरमकर, निसार खान, शिरीष गोसावी, कानिफनाथ कारखेले, कैलास माकर, प्रतीक लाहिगुडे, नासीर देशमुख, योगेश गायकवाड यांनी सापळा रचून त्याला अटक केली व त्याच्याकडील गुन्हयांची उकल केली. सागरसिंगला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT