पुणे

‘हेल्थ रेकॉर्ड’ तुमच्या खिशात!

सलील उरुणकर

तुम्ही वर्षभरामध्ये डॉक्‍टरांकडे किती वेळा जाता? प्रत्येक भेटीच्या वेळी तुम्ही किती कागदपत्रे, तपासणी किंवा चाचण्यांचे रिपोर्ट स्वतःजवळ बाळगता? या प्रश्‍नांचा गांभीर्याने विचार केल्यास लक्षात येईल, की आपण नकळतपणे कागदांचा ढीग गोळा करत बसलो आहे. त्याऐवजी मोबाईलवरील ॲप्लिकेशनद्वारे फक्त एका क्‍लिकवर जर तुम्हाला आणि तुमच्या डॉक्‍टरांना ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसली तर? ‘जेनेक्‍स-ईएचआर’ या स्टार्टअप कंपनीने अशी सुविधा उपलब्ध करून दिली असून, तिचा लाभ देशभरातील अनेक डॉक्‍टर, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, शिक्षण संस्था घेत आहेत. 

तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यात वाढत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. उपचारपद्धती वेगाने बदलत असताना डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील ‘सेवा आणि सुविधां’चा घटकही बदलत आहे. आरोग्य तपासणी, चाचण्यांच्या कागदी अहवालांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर होणे हा त्याचा एक भाग आहे. नोंदी डिजिटल स्वरूपात आल्यानंतर त्याचे विश्‍लेषण आणि त्यातून डॉक्‍टरांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे काही उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. या उपाययोजना म्हणजेच ‘प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर’. अशाप्रकारे आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे काम ‘जेनेक्‍स-ईएचआर’ ही स्टार्टअप कंपनी सध्या करीत आहे. 

‘किर्लोस्कर न्यूमॅटिक’चे माजी व्यवस्थापकीय संचालक हरी मुस्तीकर या स्टार्टअपचे मार्गदर्शक, तर मुकुल व गौरी मुस्तीकर हे सहसंस्थापक आहेत. ‘जेनेक्‍स-ईएचआर’च्या मार्गदर्शक मंडळामध्ये आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, ‘नागपूर एंजल्स’चे सहसंस्थापक शशिकांत चौधरी, संचेती रुग्णालयाचे डॉ. केतन खुर्जेकर यांचाही समावेश आहे. आतापर्यंत पुण्यासह देशभरातील २८ शहरांमध्ये हे सॉफ्टवेअर पोचले असून, ५०० हून अधिक डॉक्‍टर, क्‍लिनिक व पॅथॉलॉजी लॅब आणि २८ हून अधिक शाळा ‘जेनेक्‍स-ईएचआर’ याचा लाभ घेत आहेत.

‘जेनेक्‍स-ईएचआर’च्या संकल्पनेविषयी माहिती देताना मुकुल मुस्तीकर म्हणाले, ‘‘कौटुंबिक कारणास्तव काही वर्षांपूर्वी रुग्णालये, डॉक्‍टर, लॅब आणि रुग्ण यांच्यातील संबंध आणि व्यवहार खूप जवळून पाहायला मिळाला. त्यात रुग्णांना दिले जाणारे अहवाल, चिठ्ठ्या लिखित स्वरूपातील आहेत हे लक्षात आले. ही कागदपत्रे हरविण्याचे, वेळेवर न सापडण्याचे किंवा नेमके डॉक्‍टरांच्या भेटीवेळीस विसरण्याचे प्रमाण मोठे असल्याचेही आढळले. यावर तंत्रज्ञानाच्या आधारे काय उपाय करता येतील, असा विचार केल्यानंतर ‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ची संकल्पना सुचली. वापरकर्त्याची वैयक्तिक संवदेनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या बॅंकेप्रमाणे सुरक्षाव्यवस्था या ॲपमध्ये ठेवण्यात आली आहे.’’

‘‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्डचे फायदे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना आहेत. विशेषतः शाळेमधील सर्व मुला-मुलींच्या आरोग्य चाचण्यांची माहिती, हॉटेलमधील वेटरसह सर्व कर्मचाऱ्यांची माहिती ही या क्‍लाऊड-बेस्ड प्लॅटफॉर्मवर सहज सेव्ह करून ठेवता येते. आपत्कालीन प्रसंगात कोणत्याही विद्यार्थ्याची, कर्मचाऱ्याची वैद्यकीय माहिती डॉक्‍टरांना मिळाल्यामुळे उपचाराची दिशा ठरविणे सोपे होते. तसेच कामानिमित्त शहराबाहेर जाणाऱ्या उद्योजक, व्यावसायिक, प्रोफेशनल्स, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे ॲप वरदान ठरू शकते. प्रवासामध्ये कोणताही कागद जवळ न बाळगता तुम्ही बिनधास्त फिरू शकता. तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय मदतीची किंवा सल्ला घेण्याची वेळ आल्यास त्या शहरातील कोणत्याही डॉक्‍टरला मोबाईल स्क्रीनवरच आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती दाखवू शकता. ॲपमधील माहिती ई-मेल, व्हॉट्‌सॲपद्वारेही शेअर करण्याची सोय देण्यात आली आहे,’’ असेही मुकुल यांनी सांगितले.

कंपन्यांचे प्रमाणीकरण
या ‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’चा वापर अमेरिका व ब्रिटनमध्ये ७२ टक्के एवढा होतो, तर भारतात त्याचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. केंद्र सरकारने नुकत्याच तयार केलेल्या ‘भारतीय ईएचआर’ मानकांनुसार ‘ईएचआर’ क्षेत्रातील कंपन्यांना प्रमाणित करण्याचाही केंद्र सरकारचा विचार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT