leopard  sakal
पुणे

Pune News : शारदानगर, माळेगाव परिसरात बिबट्याचा वावर 

शुक्रवारी पहाटेच्यावेळी किरण पवार यांच्या शिवारात सदर बिबट्यायचे वास्तव्य दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव -  बारामती तालुक्यात शारदानगर, माळेगाव, मेडद गावच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व निवाऱ्याच्या शोधात एक बिबट्या आज शारदानगर येथील देवकातेनगर, पवारवस्ती परिसरात दिसून आला.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शुक्रवारी पहाटेच्यावेळी किरण पवार यांच्या शिवारात सदर बिबट्यायचे वास्तव्य दिसून आले. नीरा डावा कालव्यालगतच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मोबाईलद्वारे बिबट्याच्या वास्तव्याचे चित्रीकरण केले व ते सोशल मिडीयाद्वारे व्हायरल केले.

परिणामी गावकऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळीची पाहणी सुरू केली आहे.  तसेच संबंधित बिबट्या पकडण्यासाठी वन खात्याने प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू केल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय वन खात्याने गावकऱ्यांना बिबट्याच्या हल्ल्यापासून बचावण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती वनपाल हेमंत मोरे, अमोल पाचपुते यांनी दिली. दरम्यान, मेडद भागात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सदर घटनेचा पंचनामा बारामती तालुक्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या अधिपत्याखाली झाला आहे. तसेच पशुधन हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकिय अर्थिक मदत मिळण्यासाठी प्रतीशेळी २० हजार प्रमाणे प्रस्ताव वरिष्ठ कार्य़ालयात पाठविले आले आहेत, अशी महिती वनपाल श्री. पाचपुते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT