pune sakal
पुणे

Pune News : बाजार समिती पुणे; मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

रस्त्यावर काही दिवसानंतर टपरीवाले, हातगाडीवाले, भाजी, फळे विक्रेत्यांनी पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.

प्रवीण डोके @pravindoke007

मार्केट यार्ड - बाजार समितीने मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर मोठा गाजावाजा करून अतिक्रमण कारवाई केली होती. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्यावर सगळीकडे पार्किंग सुरू केली आहे. तरीही रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. वाहतूक कोंडी आणि वाढत्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस शिवनेरी रस्त्याचा श्वास कोंडला जात आहे.

रस्त्यावर काही दिवसानंतर टपरीवाले, हातगाडीवाले, भाजी, फळे विक्रेत्यांनी पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शिवनेरी रस्त्यावर दोन्ही बाजूने पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आवळला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. अतिक्रमण, वाहतुककोंडी आणि मार्केट यार्डातील शिवनेरी रस्ता हे कोड काही केल्या बाजार समितीला सुटलेले नाही. रस्त्यावरच बाजार मांडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही संचालकांच्या आशिर्वादामुळे यावर कारवाई होत नसल्याची चर्चा बाजार आवारात आहे

मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर सातारा रस्ता येथील सिग्नल पासून टपाल कार्यालयापर्यंत दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. याठिकाणी फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि टपर्‍यांची संख्या वाढत आहे. माल घेऊन येणारी वाहने, खरेदीसाठी येणारी वाहने वेड्यावाकड्या पद्धतीने रस्त्यावर लावली जात आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. म्हणूनच कायम या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तसेच या रस्त्यावर राडारोड्याचे प्रमाणही वाढले आहे. एकूणच हा रस्ता विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांनी पोलीस, पालिका आणि बाजार समिती अशा संयुक्त कारवाईतून हा रस्ता मोकळा केला होता. सणांच्या काळातही हा रस्ता रिकामा होता. परंतु त्यानंतर पुन्हा हा रस्ता वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणात अडकत आहे. अतिक्रमणमुक्त रस्ता केल्यानंतर गरड यांनी या रस्त्यावर पे अ‍ॅन्ड पार्क करून उत्पन्न सुरू केले.

सणांच्या काळात या रस्त्याने जाण्यास वाहनचालक धजावतात. नुकताच गणेशोत्सव, दसरा सण होऊन गेला. या काळात शेतकर्‍यांनी शिवनेरी रस्त्यावर फुलांची विक्री केली. मात्र,या रस्त्यावरील अतिक्रमणे आणि बाजार समितीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे चक्क सचिवांना वाहतुककोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप झाला.

बाजार समितीच्या शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण निर्मुलन कारवाईसाठी स्वतंत्र ठेकेदाराकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून अतिक्रमण निर्मुलनासाठी कारवाई सुरू आहे.

बापू कोतवाल, विभाग प्रमुख, सुरक्षा व अतिक्रमण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT