पुणे

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानची मेट्रो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केली जात आहे. केंद्र सरकारच्या "न्यू मेट्रो पॉलिसी'नुसार दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन प्रस्ताव पाठविणार आहे, अशी माहिती "पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. 

"पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (पीपीपी) तत्त्वावर 23 किलोमीटर अंतराची मेट्रो केली जात आहे. महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडीसह शिवाजीनगर-हिंजवडी ही तिसरी मार्गिका असणार आहे. पीएमआरडीएकडून पीपीपी तत्त्वावर जरी ही मेट्रो केली जात असली, तरी महामेट्रोसोबत संयुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे. 

दरम्यान, देशातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राने न्यू मेट्रो पॉलिसी तयार केली आहे. त्यानुसार सर्व मेट्रोचे सुधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठवावे लागणार आहेत. मेट्रोचा दुसरा टप्पा रामनगर, लक्ष्मीनगर ते हिंजवडी असा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल. त्यामध्ये पिण्याचे पाणी, गॅसलाइन, स्टेशनच्या उभारणीसाठी भूसंपादन, विकसन आणि देखभाल-दुरुस्तीचा अंतर्भाव करण्यात येईल. डिलाइट आणि जेएसएल या खासगी संस्थेकडून प्रस्ताव बनविला आहे, असेही गित्ते यांनी सांगितले. 

बालेवाडीमध्ये "मल्टिनोडल हब' बनविण्यात येत आहे. तसेच मेट्रोच्या कारशेडसाठी 50 एकर जागेच्या हस्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी 15 एकर जागेच्या मालकाचे संमतीपत्र मिळणे बाकी आहे. उर्वरित सर्व जागामालकांचे पत्र मिळाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया करून जागा ताब्यात घेतली जाईल. 
- किरण गित्ते, पीएमआरडीए, महानगर आयुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

Maharashtra Police Bharti 2025: सावधान उमेदवारांनो! पोलीस भरतीवर AIची करडी नजर; जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT