पुणे

Pune News: पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार! पाण्याच्या टँकरची खासगी ठिकाणी विक्री? स्थानिक आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

धनकवडी: धनकवडीतील आंबेगाव पठार सर्वे, नंबर १५, १६ आणि नव्याने समाविष्ट झालेला भाग या ठिकाणी प्रचंड पाणीटंचाई असून पाण्याचे टँकर मिळत नाही. मात्र, महापालिकेचे पाण्याचे टँकर इतर खासगी ठिकाणी विकले जात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

संबंधित ठेकेदारतर्फे खासगी व्यवसायासाठीसुद्धा पाण्याचा वापरासाठी जास्त किमतीत पाण्याचा टँकर विकला जात आहे. गरजू नागरिकांना पाणी मिळत नाही. याकडे मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागाने सर्रासपणे दुर्लक्ष केले आहे.

या परिसरात आधीच पाणीटंचाई आहे. त्यात महापालिकेने सुरू केलेल्या पाणी बंदच्या योजनेमुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मुळातच इथे पाणी कमी दाबाने आणि कमी वेळे येत असताना ही बंदची योजनेमुळे प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली.

म्हणून दररोज प्रत्येक सोसायटीला दहा ते बारा टँकर मागवावे लागतात. महापालिकेचे टँकर मिळत नाही. त्यामुळे खासगी टँकर मागवावे लागतात आणि खासगी टँकरला जास्त पैसे जात आहेत, असे येथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

महापालिकेच्या पाण्याचा टँकर गरजूंना मिळत नाही. गेल्या दोन दिवसांपासून पाहतो आहे. एका खासगी हॉटेलला महापालिकेच्या पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरही महापालिकेचे पिण्याचे टँकर जात आहेत.

हे पाहिले आणि संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ठेकेदाराला विचारल्यास उडवाउडीचे उत्तर दिले. त्यामुळे गरजू नागरिकांना पाण्याचा खासगी टँकर जास्तीचे पैसे देऊन मागवावा लागत आहे.

- संतोष साठे, स्थानिक रहिवासी

सध्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे, त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होत नाही आणि महापालिकेला पाण्याचा टँकर ज्या ठिकाणी दिला जातो, त्याची नोंद चलनाद्वारे असते. त्यामुळे खासगी ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. तसे आढळले तर संबंधित पाणी टँकरवर कारवाई केली जाईल.

- काशिनाथ गांगुर्डे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT