crime  sakal
पुणे

पुण्यातील सहकार नगर हादरलं! कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार

याप्रकरणी २३ वर्षीय पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune News : कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

पुण्यातील सहकार नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. शेरेकरने एकेदिवशी पाडितेला घरी बोलावले होते आणि कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

एप्रिल २०२२ मध्ये अभिमन्यूच्या मित्र प्रशांत कोळीने पीडितेला ठाण्याला नेले आणि जबरदस्तीने अभिमन्युबरोबर लग्न लावले. पीडितेने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. तसेच आईवडिलांना मारुन टाकू अशी धमकी दिली.

दरम्यान, या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेने सहकारनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT