pune news  sakal
पुणे

Pune News : शिक्षकांनी विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक - डॉ. अ. ल. देशमुख

विज्ञान भारती’ आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या सहकार्याने इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथोडॉलॉजी विथ एनईपी परस्पेक्टिव्ह’ विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील शालेय स्तरावर करण्यासाठी शिक्षकांना आपल्या मानसिकतेत आमूलाग्र बदल करावेत. अनुभव, प्रयोग, नवीन कल्पना या जोरावर पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन शिक्षकांनी स्वीकारणे आवश्यक आहे,’’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले.

‘विज्ञान भारती’ आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या सहकार्याने इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथोडॉलॉजी विथ एनईपी परस्पेक्टिव्ह’ विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. स्वाती जोगळेकर, विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री श्रीप्रसाद , मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रातील अणु ऊर्जा विभाग विज्ञान संशोधन सहयोग संकुलाचे अभियंता डॉ. जयंत जोशी, विज्ञान भारतीचे श्रीकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत विविध शाळांमधील ७५ पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘नव्या धोरणाच्या अंमलबजावणीत सुमारे ३० टक्के वाटा त्या-त्या राज्याचा असेल. शिक्षणाचा आणि अध्यापनाचा बहुशाखीय दृष्टिकोन, संशोधक वृत्ती घडवण्यावर भर, बहुभाषिकत्व, उपयोजित शिक्षणाचा पर्याय, अनुभवात्मक शिक्षण, हे नव्या शैक्षणिक धोरणातील कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांची भूमिका आणि मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.’कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जोगळेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. मानसी माळगावकर यांनी केले.

विज्ञान प्रतिभा शोध परीक्षेची नोंदणी २५ सप्टेंबरपर्यंत

विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी विद्यार्थी विज्ञान मंथन या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रतिभा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. इयत्ता सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होतात. भारतीय वैज्ञानिकांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची आणि भारतीय वैज्ञानिकांच्या प्रेरणादायी कार्याची आणि चरित्राची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. या परीक्षेसाठी वैयक्तिकरित्या अथवा शाळेच्या माध्यमातून २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ‘www.vvm.org.in’ या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT