Pune Weather Updates esakal
पुणे

Pune Weather Updates: पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

रुपेश नामदास

Pune Weather Updates: पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाने लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासून सुरू झालेला उन्हाचा चटका आता सायंकाळी पाचपर्यंत जाणवत आहे.

गेले सलग चार दिवस पुण्यातील तापमान चाळिशीच्या पलीकडेच आहे. शहरात भर दुपारी फिरताना सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे जाणवत आहे. रस्त्यांवर प्रचंड उन्हाचा चटका, तर घरामध्ये उष्म्याच्या झळा येत असल्याचा अनुभव येत आहे.

सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवलं जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, चंद्रपूर नंतर आता पुणे सर्वात उष्ण शहर झाले आहे.

कायम थंड वातावरण अशी ओळख असलेल्या पुण्याची आता हॉट सीटी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र उन्हाचा कहर वाढत आहे. बुधवारी (5 एप्रिल) रोजी पुन्हा पारा वर चढला आहे.

शिरूर 40.2 सेल्सिअस, लवळे 39 अंश सेल्सिअस, वडगाव शेरी 39 अंश सेल्सिअस, चिंचवड 38 अंश सेल्सिअस,कोरेगाव पार्क 39.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा 37.9 अंश सेल्सिअस, इंदापूर 37.3 अंश सेल्सिअस, दौंड 37.2 अंश सेल्सिअस, बालेवाडी 37 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 36.8 अंश सेल्सिअस, खेड 37.7 अंश सेल्सिअस, तळेगाव 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

abp न्यूजच्या वृत्तानुसार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana : घसरगुंडीची सुरुवात माझ्यापासून; स्मृतीने इंग्लंडविरद्धच्या पराभवाची स्वीकारली जबाबदारी

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

Gadchiroli News: माओवाद्यांची केंद्रीय समिती म्हणाली, भूपती-रूपेश ‘गद्दार’

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT