attack sakal
पुणे

Pune News : दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा रचला होता कट ?

इसिस मॉड्युल प्रकरण ; तपासात धक्कादायक माहिती समोर

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता‌. याबाबत दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात ही माहिती मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली आहे. त्याला कोठून अटक केली, ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. शाहनवाझने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोधही घेतला होता.

कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला

दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. परंतु घरझडती घेण्यासाठी जात असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

एनआयएकडून पुणे पोलिसांचे कौतुक :

एनआयएने पुणे पोलिसांना पत्र पाठवले आहे. त्यात दहशतवाद्यांकडून होणाऱ्या घातपाताचा मोठा कट उध्वस्त केल्याबद्दल पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT