suraj  sakal
पुणे

Pune News : मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे - डॉ. सूरज एंगडे

सामाजिक पुरस्कार’, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे डॉ. बबन जोगदंड यांना ‘शैक्षणिक पुरस्कार’,

सकाळ वृत्तसेवा

पुणे -‘‘मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास आणि वारसा गौरवशाली असून त्याचे महत्त्व नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. या मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे,’’ असे मत आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. सूरज एंगडे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव’ आयोजित केला होता. महोत्सवात मराठवाडा भूषण पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी स्वातंत्र्यसेनानी दत्तोबा भोसले यांचे सुपुत्र विवेकानंद भोसले, पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहत्रे, किशोर पिंगळीकर, अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक देविदास गोरे यांना ‘प्रशासकीय पुरस्कार’, साहित्यिक आसाराम लोमटे यांना ‘कला व साहित्य पुरस्कार’, द प्राइड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालय (सास्तुर) यांना ‘सामाजिक पुरस्कार’, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे डॉ. बबन जोगदंड यांना ‘शैक्षणिक पुरस्कार’,

तर ट्रान्सव्होल्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध चव्हाण यांना ‘उद्योग पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तर थोर स्वातंत्र्य सेनानी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड. जी. आर. देशमुख यांना ‘विशेष सन्मान’ करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वाधात सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

Chhatrapati Sambhajinagar: नव्या वाहिनीवरही पाणीचोरांचा 'दरोडा' सभापतींची कबुली ; तातडीने सर्वेक्षण करून हातोडा चालविण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT