hadpsar  sakal
पुणे

Pune News : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत हडपसरमध्ये तेवीस टन कचरा झाला गोळा

यावेळी सहभागी नागरिकांनी घोषणा देत स्वच्छतेबाबत प्रबोधन केले. तसेच स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

कृष्णकांत कोबल

हडपसर - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून देशभर "स्वच्छता ही सेवा मोहिम' राबविण्यात आली. हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून या अभियानांतर्गत दहा वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये २३ टन ८५० किलो ओला - सुका कचरा गोळा झाला.

आमदार चेतन तुपे पाटील, उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, आरोग्य अधिकारी सचिन लडकत, संजय धनवट यांच्यासह त्या त्या भागातील माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक सामान्य नागरिक आदी सुमारे पंचवीस हजारजण या अभियानात सहभागी झाले होते.

आमदार चेतन तुपे पाटील, उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, आरोग्य अधिकारी सचिन लडकत, संजय धनवट यांच्यासह त्या त्या भागातील माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक सामान्य नागरिक आदी सुमारे पंचवीस हजारजण या अभियानात सहभागी झाले होते.

माळवाडी येथील ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यान, लक्ष्मी कॉलनी जवळील कालवा पूल, हिंगणे मळा कालवा घाट, ससाणे नगर डी मार्ट रस्ता, ज्योती चौक कोंढवा, कडनगर चौक, सोलापूर रोड कडबा कुट्टी लगत, शेवाळवाडी फाटा, पापडेवस्ती, आदर्श नगर अशा दहा ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. सर्व ठिकाणी मिळून सुमारे १५ टन सुका तर साडेसात टन ओला कचरा गोळा करण्यात आला. यावेळी सहभागी नागरिकांनी घोषणा देत स्वच्छतेबाबत प्रबोधन केले. तसेच स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

"पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनुसार महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक तास श्रमदान मोहिमेला हडपसर, कोंढवा, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, महंमदवाडी परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रभावीपणे स्वच्छतेबाबतचा चांगला संदेश गेला आहे.'

बाळासाहेब ढवळे पाटील

सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT