Temperature 
पुणे

Pune News : एकीकडे अवकाळी अन् दुसरीकडे उन्हाचे चटके! पुणे पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवसभर दमट आणि संध्याकाळी अवकाळी पावसाच्या तडाख्यातून बुधवारी पुणेकरांची सुटका झाली खली. मात्र, दुपारी उन्हाच्या चटक्यामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही झाली होती. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शहरातील कमाल तापमानाने पुन्हा ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. म्हणजे एकीकडे अवकाळी पावसाची शक्यता असतानाच शहरात आता उन्हाचे चटके वाढत आहे.

बुधवारी सकाळपासूनच वातावरणात दमटपणा जास्त होता, तर दुपारी अंगाची लाही होईल अशा प्रकारे उन्हाचा चटका जानवत होता. काल परवा पर्यंत काहीसे थंड असलेले हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वच हैराण झाले होते.

अवकाळी पावसाचे ढग आता काहीसे दूर झाले असून, पुढील तीन दिवस तरी शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी दुपारचा हा उन्हाचा चटका पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. या कालावधीत उष्ण आणि दमट असणाऱ्या हवामानाचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता जास्त आहे.

राज्यातही वादळी पावसाने उघडीप देताच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक आहे. गुरूवारी (ता. ११) राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होणार आहे. तर कोकणात दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आजपासून (ता. ११) राज्यात मुख्यतः उष्ण कोरड्या हवामानाची शक्यता आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

- शिवाजीनगर - ४०.१

- पाषाण - ४०.१

- लोहगाव - ४०.१

- चिंचवड - ४१.८

- लवळे - ४१.८

- मगरपट्टा - ४०.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT