eid ganesh visarjan  sakal
पुणे

Pune News : राजुरी गावात सामाजिक एकतेचे दर्शन,गणेश विर्सजनाच्या दुसऱ्या दिवशी ईदची मिरवणूक

पोलीस निरीक्षक नलावडे यांणी उपस्थितांणा मार्गदर्शन करताना केले.

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

आळेफाटा- गणपती विर्सजण मिरवणुक व ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने राजुरी येथील मुस्लीम बांधवांणी ईद च्या निमीत्ताने काढण्यात येणारी पैगंबर यांच्या जयंतीची मिरवणुक विर्सजणाच्या दुस-या दिवशी काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सव व ईद ए.मिलाद या सनाच्या निमित्ताने आळेफाटा पोलीस स्टेशन च्या वतीने राजुरी (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी हा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,माजी सभापती दिपक औटी,गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,उपसरपंच माऊली शेळके,एम.डी.घंगाळे,हनुमान देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मुरलीधर औटी, शाकीर चौगुले,रंगनाथ औटी,सखाराम गाडेकर,मुस्लिम जमातीचे सदर जाकीर पटेल ,ॲड. शिवाजी औटी,जी.के.औटी संजय औटी,मिलींद पंधारे,रवि रायकर ,रवी गाडगे,बाबा पटेल,नजीरभाई शेख,इंनुस भाई चौगुले, मुज्जमिल पठाण,शकुर चौगुले, जीलानी पटेल,अरबाज चौगुले,सोहेल शेख आदी मान्यवर तसेच गावातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक नलावडे यांणी उपस्थितांणा मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्व गणेश मंडळांणी गणेश उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी सर्वांणी काळजी घेऊन पोलीसांणा सहकार्य करावे असे सांगितले.तसेच सर्व दहा दिवसांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवावेत.तसेच गावातील जी गणेश मंडळे सामाजिक सलोखा राखणारे व हिंदू मुस्लिम एकोपा जपणा-या मंडळांना उत्कृष्ट मंडळे निवडून योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT