pune sakal
पुणे

Pune News : देवेंद्र फडणवीस करतात तरी काय -सुप्रिया सुळे

प्रफुल्ल भंडारी

दौंड : महाराष्ट्रात अतिशय अस्वस्थता आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे झालेली दंगलीसह राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात तरी काय ? , असा घणाघाती प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

दौंड शहरात टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रश्न उपस्थित करीत राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दंगल, दुष्काळ, आरक्षण,

आदी प्रश्नांकडे सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाचे लक्ष नाही. सराटी अंतरावली (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आंदोलनातील महिला व मुलांना पोलिसांनी अमानुषपणे मारले आहे त्याचा मी निषेध करते. लोक अस्वस्थ आहे व त्यातूनच या गोष्टी होत आहेत. सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात तरी काय ?. मला वाटतं हे गृह मंत्रालयाचे पूर्ण अपयश आहे.

त्या पुढे म्हणाल्या, चार आठवड्यांपासून मी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दुष्काळ जाहीर करण्याची विनंती करीत आली आहे. पावसाअभावी लोक अतिशय अडचणीच्या काळातून जात आहेत. पाऊस नसल्याने आपल्या सर्वांसमोर अतिशय गंभीर आव्हान उभे राहिले आहे. पाण्याचे टॅंकर आणि चारा छावण्यांच्या नियोजनाची मागणी केलेली आहे. शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलातान सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भा भारतीय जनता पक्ष सातत्याने अपयशी झाले आहे. केंद्रात एक व राज्यात वेगळी अशी दुटप्पी भूमिका ते मांडतात.

आरक्षणाच्या बाबतीत भाजप सरकारने पूर्णपणे सर्वसामान्य जनतेला फसविले आहे. सरकार राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यापेक्षा ट्रिपल इंजिन सरकार कार्यक्रम करीत आणि जाहिरातबाजी करीत आहेत. दुष्काळाचे दौरे होत नाही आणि दुष्काळ असताना करोडो रूपयांचा चुराडा जाहिरातींवर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT